शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतरही विकासाचा वेग कायम, जीडीपीत 7 टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: February 28, 2017 20:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या रोखटंचाईमुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरित

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 28 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या रोखटंचाईमुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र नोटाबंदीदरम्यानच्या तिमाहीतही देशाच्या विकासाचा दर कायम राहिल्याचे समोर आले आहे. आज जाहीर झालेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या चालू वित्तिय वर्षातील तिसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीत 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 
आज जाहीर झालेल्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक आकडेवारीनुसार जीडीपीमध्ये सात टक्के दराने वाढ झाली आहे. या याळात उत्पादन क्षेत्रात 8.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  नोटाबंदीनंतर विविध आर्थिक संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी या वित्तीय वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 7.1 टक्क्याहून कमी राहील, अशी भीती व्यक्त केली होती. मात्र  सीएसओने सहा जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत जीडीपीच्या विकासदराची आकडेवारी 7.1 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवला होता. 
रिझर्व्ह बँकेने या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या मौद्रिक समीक्षेमध्ये चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक विकास दर घटवून 6.9 टक्के एवढा ठेवला होता.  मात्र पुढील आर्थिव वर्षासाठी विकास दरात 7.4 टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेसुद्धा आपल्या अहवालात भारताच्या आर्थिक वृद्धीच्या दरात घट करून ती 6.6 टक्क्यांवर ठेवली होती.