शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

गावच सुटले, तर भाकरी कशी मिळणार? सक्तीच्या स्थलांतरामुळे कुपोषित मुले ‘पोषण अभियाना’च्या बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 5:39 AM

गावात स्थिर राहणाऱ्या मुलांच्या (कु)पोषणाचा हिशेब ठेवून त्यांच्या पोटी दोन घास जावेत, यासाठी सरकारची यंत्रणा आहे.

- माधुरी पेठकरनाशिक -  गावात स्थिर राहणाऱ्या मुलांच्या (कु)पोषणाचा हिशेब ठेवून त्यांच्या पोटी दोन घास जावेत, यासाठी सरकारची यंत्रणा आहे. पण पाण्याने ओढ दिली की, जगण्यासाठी स्थलांतर करणाºया आईबापाबरोबर शहरांच्या आसºयाला जाणारी मुले मात्र पुन्हा उपासमारीच्या चक्रात अडकतात आणि पहिल्या पावसामागोमाग गावी परतेपर्यंत तीव्र कुपोषणाची शिकार होतात.एकात्मिक बालविकास कार्यक्रमातून मध्येच गळून जाणाºया अशा मुलांना ‘ट्रॅक’ करण्याची कोणतीच सुविधा नसल्याने एका अर्थाने पोषण कार्यक्रमाचे प्रयत्न मातीमोल होत असल्याचे चित्र राज्याच्या अनेक भागांत दिसते. सक्तीचे स्थलांतर आणि कुपोषण यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार पोषण कार्यक्रमात दुर्लक्षिला गेला आहे.स्वत:ची शेती नाही. शेतमजूर म्हणूनही गावात काम नाही. जमिनीचा तुकडा असेल, तर तो कसायला पाणी नाही. गावात रोजगाराचे दुसरे साधन नाही. गाव जगवत नाही, म्हणून सक्तीचे स्थलांतर माथी मारल्या गेलेल्या आदिवासींची मुले पुन्हा पुन्हा कुपोषणाच्या चक्रात सापडत असल्याचे दिसते.नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या चिंचओहोळ या ग्रुप ग्रामपंचायतीच्या गावपाड्यावर फिरत असताना ‘कुपोषण आणि स्थलांतर’ हा दुहेरी पेच दिसतो.‘आता या भागात कुपोषित मुलांचे आकडे कमी दिसत असले तरी जूनमध्ये जेव्हा रोजगारासाठी म्हणून गावाबाहेर गेलेली माणसे गावात येतील तेव्हा कुपोषित मुलांची संख्या वाढलेली दिसेल’, असे येथील हतबल अंगणवाडीताई सांगतात. ग्रामीण भागात ० ते ६ वयोगटातील मुलांचे पोषण आणि लसीकरणाची जबाबदारी अंगणवाडी घेते. आई-वडिलांबरोबर ही मुले स्थलांतरित होतात, तेव्हा त्यांचा अंगणवाडीशी असलेला संबंध तुटतो. स्थलांतरित होणाºया गर्भवती माताही पोषक आहार, लसीकरण आणि जननी सुरक्षा योजनेतून होणाºया लाभांना मुकतात. खाण्या-पिण्याची आबाळ, अतोनात कष्ट यामुळे त्या कुपोषित राहतात आणि त्यांच्यापोटी येणारी मुलेही कुपोषित असतात.डाळी-साळी-मांसाहार हे आहार घटक गावात स्वस्तात उपलब्ध असतात. स्थलांतरानंतर मात्र या वस्तू उक्त्या विकत घेणे परवडत नाही. विस्कळीत होणाºया आहार संस्कृतीमुळे मुलांच्या आहारात पोषण कमतरता राहाते. मुले आजारी पडली तरी उपचार करणे स्थलांतरितांना परवडत नाही. तुटपुंज्या कमाईपुढे जगण्याचा संघर्ष मोठा असल्याने अपुरा आहार, अर्धपोटी राहणे हेच त्यांचे प्राक्तन बनून जाते.मात्र पोषण - अभियानाच्या एकूण रचनेत ‘स्थलांतर आणि कुपोषण’ हा विषय अद्याप दुर्लक्षितच राहिला आहे.जगण्यासाठी दाहीदिशा : रोजगाराचा शोध माणसांना कुठून कुठे नेतो ?पालघर-मोखाड्यातून नाशिक, मुंबई, वसई, ठाणे या शहरी भागात बांधकामे आणि वीटभट्ट्यांवर मजुरीसाठीमुरबाड, शहापूर भागातून ओतूर, जुन्नर, नगरच्या शहरी भागात वीटभट्ट्यांवर.अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळीपट्ट्यातून श्रीगोंदा, राहुरी, बारामती या ठिकाणी ऊसतोडीसाठीनंदूरबार जिल्ह्याच्या ६ तालुक्यांतून एक लाखांपेक्षा जास्त कुटुंबे आॅक्टोबर ते एप्रिल, असे सहा महिने गुजरातमध्ये ऊसतोडीसाठी जातात.नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यातून नाशिक शहर परिसरात बांधकाम आणि शेतमजुरीसाठीपूर्व विदर्भातील मेळघाटाच्या सीमेवरून मुंबई, पुणे आणि नाशिक या टोकाच्या शहरात.विदर्भात गडचिरोली आणि मेळघाटातून अमरावती, नागपूर, परतवाडा या शहरी भागापासून थेट मध्य प्रदेशापर्यंत मजुरीसाठी. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य