कोलकात्यात चालत्या गाडीमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: May 31, 2016 08:43 IST2016-05-31T08:43:30+5:302016-05-31T08:43:30+5:30

पार्क स्ट्रीट परिसरात तरुणीला जबरदस्तीने गाडीमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Gangrape rape in a moving car in Kolkata | कोलकात्यात चालत्या गाडीमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

कोलकात्यात चालत्या गाडीमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

>ऑनलाइन लोकमत - 
कोलकाता, दि. 31 - पार्क स्ट्रीट परिसरात तरुणीला जबरदस्तीने गाडीमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालत्या गाडीमध्ये तब्बल तीन तासांहून अधिक वेळ तरुणीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला रस्त्यावरच सोडून आरोपींनी पळ काढला. पोलिसांना प्राथमिक पुरावे सापडले असून आरोपींचा शोध सुरु आहे. 
 
पिडीत तरुणी व्हीआयपी रोडवरील कैखली परिसरात एका बारमध्ये गाण्याचं काम करते. कामावरुन निघाल्यानंर कॅफेमध्ये जाण्यासाठी तिने अॅपवरुन टॅक्सी बोलवली होती. आरडीबी सिनेमागृहाजवळ तिने टॅक्सी सोडली. कोलकातामध्ये नवीन असल्याने तिला रस्ते माहित नव्हते त्यामुळे ती लोकांना रस्ता विचारत होती. याचाच फायदा घेत आरोपीने तिला फसवून दुस-या दिशेला नेलं अशी माहिती पिडीत तरुणीने दिल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. 
 
(बलात्काराचा प्रयत्न करणा-यांशी तरुणीचा धाडसी लढा)
 
पिडीत तरुणीने चालण्यास सुरुवात केली असता आरोपीने फोन करुन आपल्या मित्रांना बोलावून घेतले. काही वेळाने एक कार आली ज्यामध्ये चार लोक बसले होते त्यांनी जबरदस्तीने तरुणीला कारमध्ये ओढलं आणि बलात्कार केला. पहाटे 3.30च्या दरम्यान गाडी थांबवली असता तरुणीने खिडकी खोलून ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर घाबरलेल्या आरोपींनी तरुणीला तिथेच सोडून पळ काढला. 
 
एका टॅक्सी ड्रायव्हरने पिडीत तरुणीला पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं. तरुणीला रुग्णालयात भरती करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. मेडिकल टेस्टनंतर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. 
 

Web Title: Gangrape rape in a moving car in Kolkata