शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

महात्मा गांधींची १५०वी जयंती; पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 7:39 AM

150th Gandhi Jayanti : देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या, जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या, सत्याग्रहाच्या मार्गानं बलाढ्य शत्रूला नमवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज १५० वी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. गांधींच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री यांनीदेखील महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन केलं. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आज देशभरात काँग्रेस आणि भाजपानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. काँग्रेसकडून आज देशाच्या विविध भागांमध्ये पदयात्रा काढण्यात येणार आहेत. यापैकी दिल्लीतल्या पदयात्रेचं नेतृत्व सोनिया गांधी करतील. तर महासचिव प्रियंका गांधी लखनऊमधल्या, राहुल गांधी वर्ध्यातल्या पदयात्रांचं नेतृत्व करणार आहेत.  पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींच्या आदरांजली वाहून त्यांच्या दिवसाची सुरुवात केली. थोड्याच वेळात ते लालबहादूर शास्त्रींच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी विजयघाटला जातील. आज लालबहादूर शास्त्रींची ११५ वी जयंती आहे. यानंतर पंतप्रधान संसदेत जातील. तिथे दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना वंदन करतील. यानंतर मोदी साबरमती आश्रमाला भेट देण्यासाठी अहमदाबादला रवाना होतील. २०१४ मध्ये २ ऑक्टोबरला मोदींना स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली होती. याच अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आज मोदी सहभागी होतील. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगSonia Gandhiसोनिया गांधीLal Bahadur Shastriलाल बहादूर शास्त्रीcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी