शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 17:12 IST

लॉकडाऊनमध्ये लोकांच्या रोजगार, पगार यामध्ये मोठी घट झाली आहे. अनेकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. लॉकडाऊन सुरु होताच पंतप्रधानांनी कंपन्यांना कोणाला कामावरून कमी करू नका असे आवाहन केले होते. मात्र, कंपन्यांनी पगार कपातीसह खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे.

लॉकडाऊनमध्ये लोकांना भविष्याची चिंता सतावू लागली होती. यामुळे सरकारची निवृत्तीनंतरची भविष्यासाठीची मोठी योजना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) मध्ये एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये 1.03 लाख नवीन सदस्य जोडले गेले आहेत. यामुळे या काळात एनपीएसमध्ये 30 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. (national pension scheme)

लॉकडाऊनमध्ये लोकांच्या रोजगार, पगार यामध्ये मोठी घट झाली आहे. अनेकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. लॉकडाऊन सुरु होताच पंतप्रधानांनी कंपन्यांना कोणाला कामावरून कमी करू नका असे आवाहन केले होते. मात्र, कंपन्यांनी पगार कपातीसह खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. या काळात कर्मचारी कपातीचे वारे सुरु झाल्याने अनेकांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावू लागली होती. यामुळे या चिंतातूर लोकांनी एनपीएसला मोठी पसंती दिली आहे. 

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या काळात खासगी क्षेत्रातून जवळपास 1.03 लाख व्यक्तिगत आणि 206 कंपन्यांना एनपीएसला जोडण्यात आले आहे, यामध्ये 43 हजार लोक त्यांच्या कंपन्या किंवा नियुक्ती करणाऱ्या संस्थांद्वारे जोडले गेले आहेत. अन्य लोक व्यक्तीगरित्या जोडले गेले आहेत. एनपीएसमध्ये नवीन सदस्य जोडले गेल्याने 18 ते 65 वर्षांच्या कार्पोरेट सदस्यांची संख्या 10.13 लाखांवर गेली आहे. एनपीएस अंतर्गत 68 लाखहून अधिक सरकारी कर्मचारी रजिस्टर आहेत. तर 22.60 लाख लोक खासगी क्षेत्रातून आहेत. यामध्ये 7616 कंपन्यांची नोंदणी आहे. 

हे आकडे अवढ्यासाठीच महत्वाचे कारण 25 मार्चपासून देशात दोन महिन्यांचा कडक लॉकडाऊन सुरु होता. या काळात नोकरी, रोजगाराचे संकट उभे ठाकल्याने लोक सावध झाले आणि भविष्यासाठी तजवीज करू लागले. पीएफआरडीएचे अध्यक्ष सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी सांगितले की, एनपीएस कार्पोरेट कर्मचाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात आर्थिक योजना नेहमी मागे असते. मात्र, कोरोनामुळे ही सर्वात पुढे आहे. अशा कठीण काळात लोकांमध्ये आर्थिक सुरक्षा महत्वाची वाटू लागली आहे. आधी कर वाचविण्य़ासाठी खासगी कर्मचारी याचा वापर करत होते. आता भविष्यासाठी करत आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी

राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप

चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर

अखेर पॉझिटिव्ह बातमी आली! सीरम इन्स्टिट्यूटला मोठा दिलासा; ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी यशस्वी

हेल्थ इन्शुरन्समध्ये मोठे बदल झाले; कोरोना काळात जाणून घेणे महत्वाचे

स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार

ब्रेझा, व्हेन्यूला विसरणार; नवी एसयुव्ही Magnite पाहताच भले भले व्वा म्हणणार

छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी

चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनMONEYपैसाcorona virusकोरोना वायरस बातम्या