शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

जम्मू-काश्मीरमध्ये जैशच्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 6:45 AM

मोठा शस्त्रसाठा जप्त; घातपाती कारवायांचा कट उधळला  

जम्मू : जम्मूनजिक राष्ट्रीय महामार्गावर नागरोटा येथे गुरुवारी पहाटे पाच वाजता सुरक्षा दलाने तपासणीसाठी एक ट्रक अडविल्यानंतर त्यात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत ट्रकमधील जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी ठार व दोन पोलीस जखमी झाले आहेत. या दहशतवाद्यांकडून  ११ एके रायफली, ३ पिस्तुले, २९ हातबॉम्ब, ६ यूबीजीएल ग्रेनेड असा मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलाने जप्त केला आहे.काश्मीरमध्ये २८ नोव्हेंबरपासून होणाऱ्या डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल (डीडीसी)च्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घातपाती कारवाया करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले. 

काश्मीरमधील राजकीय प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असून त्या देशाच्याच इशाऱ्यानुसार जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी जम्मूहून काश्मीर खोऱ्याकडे निघाले होते. या संघटनेत काही महिन्यांपूर्वीच या दहशतवाद्यांचा प्रवेश झाला होता व त्यांनी घातपाती कारवायांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. (वृत्तसंस्था)

तब्बल साडेतीन तास चालली चकमकजम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी सांगितले की, सीआरपीएफ व जम्मू-काश्मीर पोलिसांनी अडविलेल्या ट्रकची तपासणी सुरू करताच आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. तब्बल साडेतीन तास ही चकमक चालू हाेती. दहशतवादी आत्मसमर्पन करायला तयार नव्हते. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर ग्रेनेडही फेकले. यात दाेन जखमी झाले आहेत. या ट्रकचा चालक बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले?प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत गोळीबार करून त्याच्या आडून दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात घुसविण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना भारतीय लष्कराने गुरुवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकव्याप्त काश्मिरातील अनेक दहशतवादी प्रशिक्षण छावण्या उद्ध्वस्त झाल्या. पाकव्याप्त काश्मिरातील कोणत्या भागात ही कारवाई करण्यात आली, हे मात्र समजू शकलेले नाही. अतिरेक्यांच्या घुसखोरीला अटकाव करण्यासाठी भारतीय लष्कराने कारवाई  केल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले.मात्र भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने हे वृत्त खरे नाही आणि भारताने अशी कोणतीही कारवाई केलेली नाही, असे स्पष्ट केले.

हाफीझ सईदला दहा वर्षांची शिक्षा जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीझ सईद याला दोन प्रकरणांत दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. -वृत्त/ वर्ल्ड वाइड

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी