शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
3
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
4
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
5
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
6
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
7
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
8
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
9
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
10
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
11
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
12
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
13
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
14
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
15
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
16
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
17
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
18
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
19
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
20
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

जीवाश्म इंधन वापराचा फटका गरीब-उपेक्षित घटकांनाच बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 10:04 IST

विशेषतः भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये हा प्रश्न गांभीर्याने भेडसावेल, असे यात नमूद करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: जागतिक हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर उपाय म्हणून जीवाश्म इंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी चालवल्या जात असलेल्या मोहिमेच्या ज्येष्ठ प्रतिनिधींनी या समस्येचा फटका प्रामुख्याने गरीब व उपेक्षित घटकांनाच अधिक बसेल, असा इशारा दिला आहे. विशेषतः भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये हा प्रश्न गांभीर्याने भेडसावेल, असे यात नमूद करण्यात आले आहे.

वाढते तापमान, महापूर आणि हवामानात होत असलेल्या बदलांच्या कारणांशी ज्यांचा काहीच संबंध नाही, ज्यांचे यात कोणत्याही प्रकारे योगदान नाही, अशांनाच याचा फटका बसू शकतो, असे या इशाऱ्यात म्हटले आहे.

हे सुचवले उपाय

रफालओविझ यांनी या मुलाखतीत हवामान बदलाच्या समस्येशी तोंड देण्यासाठी काही ठोस उपाय सुचवले आहेत. यात प्रामुख्याने जीवाश्म इंधनाचा वापर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी एक वास्तववादी योजना आखणे, जंगलांतील वृक्षतोड थांबवणे हे उपाय महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. परंतु, 'कोप-३०' परिषदेत यावर काहीही काम झाले नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

...तर भारताने काय करावे?

हवामान बदलाच्या समस्येमुळे निर्माण होत असलेल्या तापमानवाढ किंवा महापुरासारख्या समस्येशी तोंड देण्याच्या दृष्टीने भारताने जीवाश्म इंधनावर असलेले अवलंबित्व कमी करण्याची गरज रफालओविझ यांनी व्यक्त केली. प्रारंभी ही समस्या मान्य करून तिच्या सोडवणुकीसाठी पुढे जाण्याची मानसिकता निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत जीवाश्म इंधन अप्रसार संधीसाठी पुढाकार घेतलेल्या गटाचे संचालक अलेक्स रफालओविझ यांनी म्हटले आहे की, ब्राझीलमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'कोप-३०' परिषदेत झालेल्या औपचारिक कराराचा विचार करता, अजूनही आपण हवामानविषयक समस्यांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने खूप दूर आहोत.

English
हिंदी सारांश
Web Title : Fossil fuel impact disproportionately hurts poor, vulnerable, developing nations.

Web Summary : Experts warn phasing out fossil fuels will disproportionately affect poor and vulnerable populations, especially in developing countries like India. Rising temperatures and extreme weather will impact those least responsible, necessitating realistic plans, stopping deforestation, and reducing fossil fuel dependence.
टॅग्स :weatherहवामान अंदाजunited nationsसंयुक्त राष्ट्र संघResearchसंशोधन