शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकांना ठरविले दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 06:14 IST

फोर्टिस हेल्थ केअरमधील आपला हिस्सा विकू नका, या आदेशाचे पालन न करून रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मालविंदर व शिविंदर सिंग यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे,

नवी दिल्ली : फोर्टिस हेल्थ केअरमधील आपला हिस्सा विकू नका, या आदेशाचे पालन न करून रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मालविंदर व शिविंदर सिंग यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे, असा ठपका ठेवत याप्रकरणी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे.हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. दायची सानक्यो या कंपनीला भरपाईपोटी ३५०० कोटी रुपये द्यावेत, असा आदेश सिंगापूर लवादाने सिंगबंधूंना दिला होता. ही रक्कम कशी अदा करणार याचा तपशील सादर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सिंगबंधूंना दिला होता. न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल मालविंदरसिंग व शिविंदरसिंग यांना सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांच्या समावेश असलेल्या खंडपीठाने दोषी ठरविले. फोर्टिस ग्रुपमधील आपला हिस्सा मलेशियातील आयएचएच हेल्थ केअर कंपनीला विकण्यास सिंगबंधूंना सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली होती; पण तो आदेश न पाळणाऱ्या सिंगबंधूंना लवकरच शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.फोर्टिस ग्रुपमधील आपला हिस्सा मालविंदर व शिविंदरसिंह यांनी मलेशियाच्या कंपनीला विकून त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार दायची सानक्यो या जपानी कंपनीने एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली होती. सिंगबंधूंकडून आपल्याला भरपाई मिळण्याची शक्यता धूसर झाल्याचे या कंपनीने याचिकेत म्हटले होते. रॅनबॅक्सी ही कंपनी दायची सानक्योने २००८ साली विकत घेतली.>जपानी कंपनीच्या बाजूने लवादाचा निर्णयरॅनबॅक्सीची अमेरिकेच्या अन्न व औषध खाते, विधि विभागाकडून चौकशी सुरू आहे, ही माहिती सिंगबंधूंनी स्वत:चा हिस्सा विकताना आमच्यापासून लपवून ठेवली, असा आरोप करीत दायची सानक्योने सिंगापूरच्या लवादाकडे दाद मागितली होती.या व्यवहारानंतर दायची सानक्योला विधि विभागाकडे ५० कोटी डॉलरचा दंड भरावा लागला होता. त्यानंतर दायचीने सिंगबंधूंचा रॅनबॅक्सीमधील हिस्सा सन फार्मास्युटिकल्स कंपनीला २०१५ साली विकला. या प्रकरणात सिंगापूर लवादाने दायची सानक्योच्या बाजूने निकाल दिला होता.