पाकिस्तानचे निमंत्रण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 08:10 PM2019-09-30T20:10:53+5:302019-09-30T20:13:26+5:30

गुरुनानक जयंतीच्या  पार्श्वभूमीवर 9 नोव्हेंबर कर्तारपूर साहिब कॉरिडॉरचे उद्घाटन होणार आहे.

Former Prime Minister Manmohan Singh's invitation was rejected by Pakistan | पाकिस्तानचे निमंत्रण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नाकारले

पाकिस्तानचे निमंत्रण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नाकारले

googlenewsNext

नवी दिल्ली: पाकिस्तानातील कर्तारपूर कॅारिडॅारच्या उद्घाटनासाठी पाकिस्ताननेभारताचे माजी पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंग निमंत्रित केले होते. मात्र पाकिस्तानने दिलेले निमंत्रण मनमोहन सिंग यांच्याकडून नाकरण्यात आले आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आम्ही भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कर्तारपूर कॅारिडॅारच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. मात्र निमंत्रण देण्याच्या आधीच मनमोहन सिंग यांनी उद्घाटनासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

गुरुनानक जयंतीच्या  पार्श्वभूमीवर 9 नोव्हेंबर कर्तारपूर साहिब कॉरिडॉरचे उद्घाटन होणार आहे. पाकिस्तान भारतीय सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत तर भारत गुरदासपूरमधील डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंत कॉरिडॉर बांधणार आहे. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबरमध्ये हा कॉरिडॉर सुरू होणार आहे.

Web Title: Former Prime Minister Manmohan Singh's invitation was rejected by Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.