सीमाभागातील काँग्रेसचे नेते, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन; अंत्ययात्रेला जनसागर लोटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:47 IST2025-06-18T13:45:26+5:302025-06-18T13:47:45+5:30

लोकनेता म्हणून होते परिचित

Former MLA from Nipani Kakasaheb Patil passes away | सीमाभागातील काँग्रेसचे नेते, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन; अंत्ययात्रेला जनसागर लोटला

सीमाभागातील काँग्रेसचे नेते, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन; अंत्ययात्रेला जनसागर लोटला

दत्तात्रय पाटील 

म्हाकवे : सीमाभागातील काँग्रेसचे नेते, निपाणी तालुका होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे निपाणी मतदारसंघाचे माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील (वय-७० रा. वाळकी) यांचे मंगळवारी (दि.१७) मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लोकनेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

काही वर्षांपूर्वी त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांची तब्येत खालावली होती. महिन्यापुर्वी त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल केले होते. मात्र,त्यांचे शरीर उपचारासाठी प्रतिसाद देत नव्हते. काल मंगळवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
कणंगला जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून येत आपल्या नेतृत्वाची मुहूर्तमेढ रोवली. विधानसभेच्या १९९९, २००४, २००८ या सलग तीन निवडणुका जिंकत हँटट्टीक केली होती. 

Web Title: Former MLA from Nipani Kakasaheb Patil passes away