शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

लेकाच्या लग्नात 'बाप'माणूस सिद्धू थिरकले; मुलगा करण अडकला विवाहबंधनात, VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 19:12 IST

navjot singh sidhu news today : काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचा मुलगा करण सिद्धू विवाहबंधनात अडकला.

माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचा मुलगा करण सिद्धू विवाहबंधनात अडकला. गुरूवारी त्याने सातफेरे घेतले. सिद्धू यांनी लग्नाची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. सिद्धू यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये  नवज्योत सिंग सिद्धू, करण सिद्धू आणि वधू इनायत रंधावा दिसत आहे. लग्नाशी संबंधित एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू डान्स करताना दिसत आहेत.

दरम्यान, या वर्षी जूनमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी इनायत रंधावाची ओळख करून दिली होती. सिद्धू यांनी आपल्या कुटुंबीयांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. खरं तर पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अर्थात सिद्धू म्हणाले होते की, त्यांच्या मुलाने गंगा नदीच्या काठावर आपल्या होणाऱ्या पत्नीला सात जन्म सोबत राहण्याचे वचन देवून आपल्या आईच्या इच्छेचा सन्मान केला. इनायत ही पटियाला येथील रहिवासी आहे. पटियालामधील प्रसिद्ध नाव असलेल्या मनिंदर रंधावा यांची ती मुलगी आहे. त्यांनी सैन्यात सेवा बजावली आहे.

करण सिद्धूबद्दल भाष्य करायचे झाले तर, तो पेशाने वकील आहे. त्याने एमिटी विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच न्यूयॉर्कमधील बेंजामिन एन. कार्डोझो स्कूल ऑफ लॉमधून मास्टर ऑफ लॉ पदवी प्राप्त केली. दहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर २ एप्रिल २०२३ रोजी काँग्रेस नेते सिद्धू यांची जेलमधून सुटका करण्यात आली. ५९ वर्षीय नवज्योत सिंग सिद्धू रोड-रेज घटनेत शिक्षा भोगत होते, ज्यात ३४ वर्षांपूर्वी गुरनाम सिंग या ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे अमृतसरमधून खासदार राहिले आहेत. ते पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच माजी क्रिकेटपटूही राहिले आहेत. नवज्योत सिद्धू यांच्या पत्नीचे नाव डॉ.नवज्योत कौर सिद्धू आहे. राबिया सिद्धू असे मुलीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू याही राजकारणी राहिल्या आहेत. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूmarriageलग्नcongressकाँग्रेसPunjabपंजाब