भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 15:38 IST2025-08-31T15:34:16+5:302025-08-31T15:38:18+5:30
Former MLA Nalin Kotadiya, Jagdish Patel IPS News: गुजरातमधील भाजपचे माजी आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी आणि इतर १२ जणांना अहमदाबादमधील एसीबी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
Nalin Kotadiya Jagdish Patel News: भाजपचे माजी आमदार नलिन कोटडिया, अमरेलीचे माजी पोलीस अधीक्षक जगदीश पटेल, माजी पोलीस निरीक्षक अनंत पटेल यांच्यासह १४ जणांना दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अहमदाबाद शहर लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. २०१८ मध्ये एका बिल्डरचे अपहरण करून बिटकॉइन लुटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने माजी आमदारासह १४ जणांना दोषी ठरवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०१८ मध्ये सूरतमधील बांधकाम व्यावसायिक शैलेश भट्ट यांनी आरोप याप्रकरणात तक्रार दिली होती. एका प्रकरणाची चौकशी करताना अमरेलीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे अपहरण केले. त्यांना धमक्या दिल्या गेल्या. त्यांच्याजवळ असलेले १२ कोटी रुपयांचे बिटकॉइन स्वतःच्या खात्यामध्ये जमा केले. शैलेश भट्ट यांचे अपहरण आणि बिटकॉइन लुटीमध्ये भाजपचे माजी आमदार नलिन कोटडियाही सामील होते.
कुणी रचला होता कट?
शैलेश भट्ट यांनी त्यांचा सहकारी किरीट पलाडिया हा पोलिसांसोबत या कटात सामील असल्याचा आणि त्यानेच हा कट रचलेला असल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण सीआयडीकडे गेले. तपासामध्ये किरीट पलाडिया यानेच पूर्ण कट रचलेला होता, असे सिद्ध झाले.
पोलिसांना अटक केल्यानंतर माजी आमदाराचे नाव
या प्रकरणात अहमदाबाद सीआयडीने २०१८ मध्ये पोलीस अधीक्षकासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली होती. शैलेश पलाडिया आणि पोलिसांना अटक केल्यानंतर भाजपचे माजी आमदार नलिन कोटडियाही या प्रकरणात सामील होते, हे समोर आले.
नलिन पलाडियांना महाराष्ट्रात अटक
बिल्डरचे अपहरण आणि बिटकॉइन लूट प्रकरणात नाव समोर आल्यानंतर नलिन कोटडिया भूमिगत झाले होते. त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले. नलिन कोटडिया महाराष्ट्रात लपले होते. त्यांना सप्टेंबर २०१८ मध्ये धुळ्यात अटक करण्यात आली होती. ते त्यांच्या एका साथीदाराच्या घरात लपलेले होते.