शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाविरोधात राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रावरून माजी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये दोन गट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 15:24 IST

 भाजपाकडून सेनादलांच्या पराक्रमाचे राजकारण होत असल्याचा आरोप करत माजी सैन्यप्रमुख आणि माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवल्याचे समोर आल्याने ऐन निवडणुकीच्या मोसमात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली -  भाजपाकडून सेनादलांच्या पराक्रमाचे राजकारण होत असल्याचा आरोप करत माजी सैन्यप्रमुख आणि माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवल्याचे समोर आल्याने ऐन निवडणुकीच्या मोसमात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र आता या पत्रावरून माजी लष्करी अधिकाऱ्यांमध्येच दोन गट पडल्याचे दिसत आहे. त्यापैकी काही वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांनी आपण अशा प्रकारच्या पत्रावर सह्या केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तर काही अधिकाऱ्यांनी मात्र आपण पत्र वाचल्यानंतर त्याखाली आपल्या नावाचा समावेश करण्यास परवानगी दिल्याचे मान्य केले आहे.  दरम्यान, अशा प्रकारचे कुठलेही पत्र आपल्यापर्यंत पोहोचले नसल्याचे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे.  पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी आपले मत पुलवामा हल्ल्यात शहिदांना आणि बालाकोट येथे एअरस्ट्राइक करणाऱ्या जवानांना समर्पित करावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील आपल्या सभेत केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच लष्कातील अनेक माजी अधिकाऱ्यांनीही सैन्याच्या राजकीय वापराबाबत नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, भाजपकजून भारतीय सैनिकांच्या बलिदानाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असतानाच, माजी सेना प्रमुखासह निवृत्त अधिकाऱ्यांनी याबाबत राष्ट्रपती यांना पत्र लिहल्याचे वृत्त आले होते. तीन माजी सेनाप्रमुख आणि 156 अधिकाऱ्यांनी हे पत्र लिहिल्याचे सांगण्यात येत होते. मात्र या पत्रात उल्लेख असलेले माजी सेना अधिकारी जनरल एस. एफ. रॉड्रिक्स यांनी तसेच माजी हवाई दलप्रमुख एन. सी. सुरी यांनी अशा प्रकारचे पत्र लिहिण्यास आणि त्यात आपल्या नावाचा समावेश करण्यास आपण सहमती दिली नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे मेजर जनरल हर्ष कक्कड यांनी आपण हे पत्र वाचल्यानंतर त्यात आपल्या नावाचा समावेश करण्यास परवानगी दिली होती असे म्हटले आहे. याशिवाय माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनीही अशा प्रकारचे पत्र लिहिल्याचे मान्य केले आहे.  

 

लष्करी अधिकारी एस. एफ. रॉड्रिग्स यांनी अशा प्रकारचे कुठलेही पत्र लिहिल्याची माहिती नसल्याचे म्हटले आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या नावे फिरत असलेल्या एका पत्रामध्ये एस. एफ. रॉड्रिग्स यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

माजी एअर चीफ मार्शल एन. सी. सुरी यांनीही अशा प्रकारच्या पत्रावर सही केल्याचे वृत्त फेटाळले आहे. ''हे काय चालू आहे मला माहिती नाही. मी माझ्या संपूर्ण जीवनात राजकारणापासून दूर राहिलो आहे. 42 वर्षे अधिकाऱी म्हणून काम केल्यानंतर आता हे होऊ शकत नाही. जीवनात मी नेहमी देशाला प्राधान्य दिले आहे. अशाप्रकारच्या बातम्या कोण पसरवत आहे हे मला माहित नाही. हे फेक न्यूजचे उत्तम उदाहरण आहे."' असे सुरी म्हणाले. तसेच अॅडमिरल रामदास यांनी लिहिलेले हे पत्र नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

माजी उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल एम. एल. नायडू यांनीही अशे पत्र लिहिण्यापूर्वी आपल्याकडून परवानगी घेतली असल्याचे किंवा आपण अशा प्रकारचे कुठले पत्र लिहिल्याचे वृत्त फेटाळले आहे. 

मात्र मेजर जनरल हर्ष कक्कर यांनी या पत्रावर आपली सही असल्याचे मान्य केले आहे. तसेच संपूर्ण विषय वाचल्यानंतरच आपण या पत्राला सहमती दिल्याचे म्हटले आहे. त्यांच्याशिवाय माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनीही असे पत्र लिहिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्षLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण