शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात पुराचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 1:57 AM

पुरानंतर भूस्खलनाने संकट गडद; केरळात भूस्खलनानंतर ४० जण अडकले; विमान उड्डाणे थांबवली

उधगमंडलम : तामिळनाडूच्या पहाडी भागातील नीलगिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत ५ जणांचा मृत्यू झाला. या भागात एका दिवसात रेकॉर्ड ९११ मि.मी. पाऊस झाला आहे. प्याकरा भागात एका घराची भिंत कोसळून माय- लेकींचा मृत्यू झाला, तर एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले. अमुथा (३५) आणि काव्या (१०), अशी मृतांची नावे आहेत, तर या महिलेचे पती कृष्णमूर्ती यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अन्य एका घटनेत दोन कामगार महिलांचे मृतदेह एका नाल्यात आढळून आले आहेत. भिंत कोसळून एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींशी चर्चानवी दिल्ली : केरळ आणि आपल्या लोकसभा मतदारसंघातील वायनाड येथील पूरस्थितीबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मदत मागितली. राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटर हँडलनुसार, त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आणि केरळ व विशेषत: पूर व भूस्खलनाचा तडाखा बसलेल्या लोकांना सर्वतोपरी मदत देण्याची मागणी केली. राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटर हँडलवर म्हटले आहे की, पंतप्रधानांनी पूरग्रस्त लोकांना आवश्यक ती साहाय्यता देण्याचा शब्द दिला आहे. तत्पूर्वी, केरळातील पुराबाबत चिंता व्यक्त करताना राहुल गांधी यांनी गुरुवारी पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी पुढे यावे.

केरळमध्ये ३ दिवसांत पूर, भूस्खलनात 45 जणांचा मृत्यू14 जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी24 ठिकाणी भूस्खलनाच्या घटनावायनाड, मलप्पुरम, कन्नूर आणि इडुक्की या शहरांना पुराचा सर्वाधिक तडाखा64000 लोक आश्रय शिबिरातवायनाडमध्ये भूस्खलनाची सर्वात मोठी घटना. मेप्पाडीत दोन डोंगरांमधील भाग पूर्ण वाहून गेला. मेप्पाडीत पुथुमाला येथे भूस्खलनानंतर40 लोक फसले आहेत. एनडीआरएफ, पोलीस, वन अधिकारी मदतकार्यासाठी सरसावले आहेत.09 लोकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.मल्लपुरममध्ये घर कोसळून एकाच कुटुंबातील 04 जणांचा मृत्यू.राज्याच्या काही भागांत जोरदार वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. राज्यातील शैक्षणिक संस्था शनिवारी राहणार बंद.विमान उड्डाणे रविवारपर्यंत केरळात रद्दकोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर पावसाचे पाणी साचल्याने येथील विमान उड्डाणे रविवारपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. विमानतळाच्या व्यवस्थापनाने सांगितले की, रविवारी दुपारी तीनपर्यंत विमान उड्डाणे बंद राहतील.कर्नाटकातील 80000 लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलविलेराज्यात पाऊस व पूर संबंधित विविध घटनांत 12येडियुरप्पा यांनी मुधोलमध्ये पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. बेळगावला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मलनाड जिल्ह्यात अनेक भागाला पुराचा तडाखा बसला आहे. ज्या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे त्यात बागलकोट, विजयपुरा, रायचूर, यादगिरी, उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, शिवमोगा, कोडागू आणि चिकमंगलूर यांचा समावेश आहे.उत्तराखंडात माय-लेकी वाहून गेल्यागोपेश्वर : फलदिया (जिल्हा चामोली) खेड्यात शुक्रवारी पहाटे जोरदार पावसामुळे घरात छोट्या ओढ्याचे चिखलमय पाणी शिरून सात वर्षांच्या मुलीसह तिची आई वाहून गेली, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. के. जोशी यांनी सांगितले. फलदिया खेड्यात चिखलमय पाण्याने वाहिलेल्या उलंगरा ओढ्याने डझनभर घरे आणि गोठे जलमय केले व जनावरे जिवंत गाडली गेली, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :floodपूरKarnatakकर्नाटकTamilnaduतामिळनाडू