शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

Flash Back सप्टेंबर २०१४

By admin | Updated: December 23, 2014 00:00 IST

५४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना कोर्टाने दोषी ठरवले आणि चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. कायद्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पनीरसेल्वम या जयललितांच्या विश्वासू सहका-याने मुख्यमंत्रीपद स्वीकारले.पहिल्याच प्रयत्नात मंगळाचा अभ्यास करण्यासाठी हातात घेतलेली मंगळयान मोहीम भारताने यशस्वी केली. ७४ दशलक्ष डॉलर्स खर्च आलेली ही मोहीम सर्वात ...

५४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना कोर्टाने दोषी ठरवले आणि चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. कायद्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पनीरसेल्वम या जयललितांच्या विश्वासू सहका-याने मुख्यमंत्रीपद स्वीकारले.

पहिल्याच प्रयत्नात मंगळाचा अभ्यास करण्यासाठी हातात घेतलेली मंगळयान मोहीम भारताने यशस्वी केली. ७४ दशलक्ष डॉलर्स खर्च आलेली ही मोहीम सर्वात स्वस्त ठरली असून प्रतिकलोमीटर रिक्षेचा खर्च यापेक्षा जास्त आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी इस्रोचे कौतुक केले.

राजस्थान मध्यप्रदेश व गुजरातमधल्या काही गरबा आयोजकांनी गरब्यामध्ये मुस्लीमांना प्रवेश देणार नाही असे जाहीर केले आणि पुन्हा एकदा धार्मिक ताणतणाव समोर आले.

१९६१ पासून भारतीयांना वेळ दाखवणारी HMT ही कंपनी गेली १४ वर्षे तोट्यात असल्याने बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

ऑस्ट्रेलियाने भारताबरोबर अणूकरारावर सह्या केल्या आणि भारतावर आपला संपूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. या करारामुळे अणू ऊर्जेसाठी इंधनाची टंचाई भासणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

शिक्षकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या विद्यार्थ्यांना संबोधित करतील आणि त्यांचं भाषण ऐकवण्याची सुविधा सगळ्या शाळांनी करावी अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या. यावरून प्रचंड रणकंदन माजलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौ-यावर. जपानने भारतात २.१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले. जपानकडे हार्डवेअर आहे तर भारताकडे सॉफ्टवेअर असे सांगत मोदींनी जपानी गुंतवणुकीसाठी आवाहन केले.

जम्मू व काश्मीरला अभूतपूर्व पूराने तडाखा दिला. १५० पेक्षा जास्त जणांचे प्राण गेले तर लाखो लोकांना फटका बसला. जम्मू व काश्मिरच्या निवडणुका त्यामुळे पुढे ढकलण्यात आल्या.

उत्तर प्रदेशमध्ये लव्हजिहादचा मुद्दा RSS शी संबंधित संघटनांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरला. भाजपाने अधिकृतरीत्या यावर कधीही भाष्य केले नसले तरी युपीमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

शिवसेनेने भाजपाला ११९ जागा देण्यास तयारी दर्शवली तर भाजपाने १२६ ते १३० जागांची मागणी केली. दोन्ही पक्षांमधली चर्चा शेवटपर्यंत संपलीच नाही अखेर २५ वर्षांची युती भंगली. पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेससोबतची आघाडी तोडत असल्याचे जाहीर केले.

न्यूयॉर्कमधल्या मेडिसन स्क्वेअरमध्ये नरेंद्र मोदींनी आपल्या वक्तृत्वशैलीने एनआरआयना मंत्रमुग्ध केले आणि अमेरिकी भारतीयांमध्येही मोदींची लाट असल्याचे दिसून आले.