शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संघाची पहिली लष्करी शाळा सुरू होणार; एप्रिलपासून वर्ग भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 20:14 IST

शाळेच्या इमारतीचं बांधकाम जवळपास पूर्ण; लवकरच प्रवेश प्रक्रिया

लखनऊ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली लष्करी शाळा उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरात सुरू होणार आहे. एप्रिल महिन्यात ही शाळा सुरू होईल. रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिर (आरबीएसव्हीएम) असं या शाळेचं नाव असेल. रज्जू भैय्या माजी सरसंघचालक होते. या शाळेची इमारत जवळपास पूर्ण झाली असून इयत्ता सहावीच्या पहिल्या तुकडीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या तुकडीत १६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. आरबीएसव्हीएममध्ये राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी, नौदल अकादमी आणि भारतीय लष्कराच्या तांत्रिक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यात येईल, अशी माहिती शाळेचे संचालक शिव प्रताप सिंह यांनी दिली. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यानंतर १ मार्चला विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचं सामान्यज्ञान, गणित, इंग्रजी तपासून पाहण्यासाठी प्रवेश प्रक्रिया घेतल्यानंतर त्यांची मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. यानंतर ६ एप्रिलपासून शाळा सुरू होईल, असं सिंह यांनी सांगितलं. आरबीएसव्हीएममध्ये आठ जागा देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या मुलांसाठी राखीव असतील. या मुलांना वयातही सवलत दिली जाईल. या व्यतिरिक्त शाळेत कोणतंही आरक्षण असणार नाही. या शाळेत सीबीएसईचा अभ्यासक्रम असेल. शाळेसाठी शिक्षक आणि व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. विद्या भारती या संघाच्या शिक्षण संघटनेमधील व्यक्तीची शाळेच्या मुख्याध्यापकपदी निवड करण्यात येईल. आरबीएसव्हीएममध्ये विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोघांनाही गणवेश असेल. विद्यार्थ्यांना फिकट निळ्या रंगाची आणि गडग निळ्या रंगाची पँट असा गणवेश असेल. तर शिक्षकांना पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पँट असा गणवेश देण्यात येईल. विद्यार्थ्यांना नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन देण्यासाठी ही शाळा सुरू करण्यात येत असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यानं दिली.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ