शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उस्तादांची हरवलेली ‘सखी’ सापडली

By admin | Updated: July 2, 2014 03:13 IST

आपल्या लाडक्या सखीच्या गहाळ होण्याने प्रचंड अस्वस्थ झालेल्या उस्ताद अमजद अली खान यांच्यासह अवघ्या देशाचा जीव अखेर भांड्यात पडला

नवी दिल्ली : आपल्या लाडक्या सखीच्या गहाळ होण्याने प्रचंड अस्वस्थ झालेल्या उस्ताद अमजद अली खान यांच्यासह अवघ्या देशाचा जीव अखेर भांड्यात पडला. ब्रिटिश एअरवेजने त्यांचे ४५ वर्षांचे सोबती असलेले सरोद सुखरूप असल्याचे कळविले आहे. शनिवारी रात्री लंडनहून दिल्लीला येताना त्यांचे हे खास सरोद काही काळासाठी गहाळ झाले होते. आपण या सरोदद्वारे संवाद साधत असतो अशा शब्दात अमजद अली खान यांनी या वाद्यासोबत आपले जुळलेले नाते सांगितले होते. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त उत्साद खान यांनी मंगळवारी टिष्ट्वटरवर याची माहिती दिली. ब्रिटिश एअरवेजने आपले सरोद आपणास परत करून हरविलेल्यासोबत भेट घडवून आणली. ब्रिटिश एअरवेजने माझे सरोद मला परत केले आहे. आपण दाखविलेल्या प्रेम व आत्मियतेबद्दल धन्यवाद असेही खान यांनी टष्ट्वीटरवर नमूद केले आहे. अमजद अली खान आपली पत्नी सुब्बालक्ष्मी यांच्यासोबत डार्टिंगटनमध्ये कार्यक्रमासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात २८ जून रोजी दिल्लीत उतरल्यानंतर सामानात आपले सरोद नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते शोधण्याचे सर्व प्रयत्न विफल झाल्याने उस्ताद काहीसे खिन्नही झाले होते. त्यांनी आपली खिन्नता प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर व्यक्त केली. सरोदच्या प्रतीक्षेत असलेल्या अमजद अली खान यांनी, एवढी मोठी विमानकंपनी अशी बेजबाबदार वर्तन कसे करू शकते, असा प्रश्नही उपस्थित केला होता.