ब्रह्मपुत्रेमध्ये फेरीबोट उलटली; 1 ठार, 23 बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 17:10 IST2018-09-05T17:06:06+5:302018-09-05T17:10:26+5:30

होडीतील 12 प्रवासी पोहून नदी किनाऱ्यावर आले आहेत.

Ferrybot dropped in Brahmaputra; 1 killed, 23 missing | ब्रह्मपुत्रेमध्ये फेरीबोट उलटली; 1 ठार, 23 बेपत्ता

ब्रह्मपुत्रेमध्ये फेरीबोट उलटली; 1 ठार, 23 बेपत्ता

गुवाहाटी : गुवाहाटी येथील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये 45 जणांना घेऊन जाणारी फेरीबोट पलटल्याने एक जण ठार तर अन्य बेपत्ता झाले आहेत. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांनी तपास मोहीम हाती घेतली असून होडीतील 12 प्रवासी पोहून नदी किनाऱ्यावर आले आहेत.




ब्रह्मपुत्रा नदीमध्ये फेरीबोटीतून 45 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी फेरीबोटीच्या इंजिनामध्ये बिघाड झाला. यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर नाव वाहून जात होती. यावेळी अश्वक्लांतका मंदिराजवळ एका खडकाला फेरीबोट आदळल्याने अपघात झाला. फेरीबोटीमध्ये केवळ 22 जणांकडेच अधिकृत तिकिट होते. तसेच या 18 मोटरसायकल होत्या. यामुळे फेरीबोटीवर जादा वजन होते. या फेरीबोटीमध्ये महिलांसह मुलेही होती.

Web Title: Ferrybot dropped in Brahmaputra; 1 killed, 23 missing