मैत्रिणीवर जडले प्रेम, तिच्यासाठी सेक्स चेंज ऑपरेशन केले; नकार दिल्यावर जिवंत जाळले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 16:52 IST2023-12-25T16:52:45+5:302023-12-25T16:52:58+5:30

या घटनेने पोलिसही चक्रावून गेले.

Fell in love with girl, performed sex change operation; they burned her alive | मैत्रिणीवर जडले प्रेम, तिच्यासाठी सेक्स चेंज ऑपरेशन केले; नकार दिल्यावर जिवंत जाळले...

मैत्रिणीवर जडले प्रेम, तिच्यासाठी सेक्स चेंज ऑपरेशन केले; नकार दिल्यावर जिवंत जाळले...

चेन्नई: चेन्नईच्या थलंबूर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिल्यामुळे आरोपीने वाढदिवसाच्या दिवशीच मैत्रिणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आरोपी तरुण हा पूर्वी तरुणी होता आणि मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी त्याने सेक्स चेंज ऑपरेशन केले होते. पम, नंतर तरुणीने लग्नास नकार दिल्यामुळे आरोपीने तिची निर्घृण हत्या केली.

पोलिसांनी आरोपी वेत्रीमारन याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेत्रीमारनने काही काळापूर्वीच सेक्स चेंज ऑपरेशन केले होते. लिंग बदलण्यापूर्वी त्याचे नाव पंडी मुरुगेश्वरी होते. मुरुगेश्वरी आणि नंदिनी, मदुराई येथील शाळेत सोबत शिकल्या आणि तेव्हापासून चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघींमध्ये प्रेम जुळले, नंतर मुरुगेश्वरीने नंदिनीसोबत लग्नासाठी तिचे लिंग बदलले. 

लिंब बदल शस्त्रक्रिया केल्यानंतर मुरुगेश्वरीने तिचे नावही वेत्रीमारन ठेवले. पण, नंतर नंदिनीने वेत्रीमारनसोबत संबंध ठेवण्यास किंवा लग्न करण्यास नकार दिला. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नंदिनी आठ महिन्यांपूर्वी चेन्नईला नोकरीसाठी आली होती. शनिवारी वेत्रीमारन नंदिनीला भेटण्यासाठी चेन्नईला गेला. दोघांनी भेटून बराचवेळ सोबत घालवला.

यादरम्यान आरोपीने पोमर येथे निर्जनस्थळी गाडी थांबवून नंदिनीचे हात-पाय बांधले आणि तिच्या मानेवर व हातावर ब्लेडने वार केले. त्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. नंदिनीचा आवाज ऐकून परिसरातील काही लोक घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. अखेर नंदिनीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

Web Title: Fell in love with girl, performed sex change operation; they burned her alive