Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:38 IST2025-10-08T18:37:18+5:302025-10-08T18:38:48+5:30
Cough Syrup : फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.

Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. कफ सिरपशी संबंधित घटनांवर कारवाई करणं अत्यंत आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यासाठी फेडरेशनने आरोग्य मंत्रालयाला तातडीने अनेक पावलं उचलण्याची विनंती केली आहे.
केंद्रीय चौकशी समितीने निष्पक्ष चौकशी
- औषधाच्या उत्पादन, चाचणी आणि वितरणाच्या प्रत्येक टप्प्याची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी केंद्रीय चौकशी समिती स्थापन करावी.
तज्ज्ञांचा सहभाग
- पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टर, औषधशास्त्रज्ञ आणि विविध राज्यांतील प्रतिनिधींचा समावेश असावा.
अहवाल आणि शिफारसी
- अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून समितीने सविस्तर अहवाल सादर करावा.
"ते औषध नव्हतं, विष होतं, मी स्वत: माझ्या मुलाला..."; लेकाच्या मृत्यूनंतर आईचा टाहो
देशव्यापी चौकशी
- लहान मुलांच्या औषधांची आणि सिरपची रँडम गुणवत्ता तपासणी करावी.
राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय
- फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या मते, औषध नियंत्रण विभागांमध्ये चांगला समन्वय असला पाहिजे.
पीडित कुटुंबांना मदत
- उपचार आणि भरपाई दिली पाहिजे आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
चुकीच्या औषधांच्या विक्रीवर बंदी
- प्रिस्क्रिप्शनशिवाय विकल्या जाणाऱ्या नॉन-ओटीसी औषधांवर कडक देखरेख ठेवली पाहिजे.
डॉक्टरांना उगाचच अडकवू नये
- तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही डॉक्टरवर चुकीचा आरोप करून कारवाई नये. अटक केलेल्या डॉक्टरांना ताबडतोब सोडलं पाहिजे. तपास अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली पाहिजे. FAIMA आणि IMA सारख्या मान्यताप्राप्त संस्थांना देखील यात सहभागी करून घेतलं पाहिजे.