सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:56 IST2025-11-17T12:53:35+5:302025-11-17T12:56:31+5:30
सौदी अरेबियामध्ये मक्काहून मदीनाला जाणाऱ्या बसला अपघात झाला, या अपघातामध्ये ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले.

सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
सौदी अरेबियामध्ये उमरा यात्रेदरम्यान झालेल्या एका दुर्दैवी अपघातात किमान ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यातील बहुतेक प्रवासी हैदराबादचे असल्याचे सांगितले जात आहे. तेलंगणा सरकार आणि जेद्दाहमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये टँकरशी टक्कर झाल्यानंतर बसला आग लागल्याचे दिसत आहे.
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री १.३० च्या सुमारास घडला, यावेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. समोरून येणाऱ्या एका वेगाने येणाऱ्या टँकरने बसला धडक दिली. टँकरमध्ये डिझेल भरलेले असल्याचे वृत्त आहे. धडक लागताच त्याला आग लागली आणि बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसमधून धुराचे लोट दिसत होते. प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच कळाले नाही.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने बचाव कार्यासाठी पोहोचल्या. जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने ८००२४४०००३ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दु:ख व्यक्त केले
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सौदी अरेबियामधील अपघातावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट केली . "सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताने मला खूप धक्का बसला आहे. रियाधमधील आमचे दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास या अपघातात बाधित झालेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत आहेत. शोकाकुल कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो", असंही एस जयशंकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
VIDEO | Telangana: “A total of 46 people were travelling in the bus; one survivor is under treatment. More details are awaited,” says Hyderabad Police Commissioner VC Sajjanar on the Saudi bus accident.#Telangana#Hyderabad#SaudiBusAccident
— Press Trust of India (@PTI_News) November 17, 2025
(Full video available on PTI Videos… pic.twitter.com/OX0x3cMNYB