शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

फौजिया खान, शिबू सोरेन यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 01:05 IST

खान यांच्यासमवेत विविध राज्यांमधील १५ जणांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉ. फौजिया खान यांनी सोमवारी राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर, डिजिटल कामकाजाचा प्रभाव संसदेत दिसला. खान यांच्यासमवेत विविध राज्यांमधील १५ जणांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.त्यात झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी, द्रमुकचे तिरूची शिवा व भाजप प्रवक्ते सय्यद झफर इस्लाम यांचा समावेश होता.काँग्रेसच्या फुलो देवी नेताम, एम. व्ही. श्रेयमस कुमार (लोकतांत्रिक जनता दल), वालवेरॉय खारलुकी (नॅशनलिस्ट पीपल्स पार्टी), एनआर एलांगो, ए. पी. सेलवारसू (द्रमुक), के. केशव राव, के. आर. सुरेश रेड्डी ( तेलंगण राष्ट्र समिती), जयप्रकाश निषाद (भाजप) व तृणमूल काँग्रेसच्या अर्पित घोष यांनी शपथ घेतली.अधिवेशनाच्या उत्साहावर कोरोनाचे सावटही दिसले. एरवी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीने शपथ घेतल्यावर त्याचे हस्तांदोलन करून अभिनंदनाची प्रथाही यंदा बदललेली दिसली. खासदार, राज्यसभेचे महासचिव देश दीपक वर्मा यांनीदेखील नूतन खासदारांशी हस्तांदोलन टाळले. उप-सभापतींच्या निवडीनंतर पक्षनेत्यांनी जागेवर बसूनच भाषण करणे पसंत केले. प्रत्येक खासदाराने मास्क परिधान केला होता.कामकाजातून पुरेसा वेळ काढून खासदार संसद कॉरिडॉरमध्ये असलेल्या टी व कॉफी बोर्डाच्या सेवेचाही लाभ घेतात. कामकाज तहकूब झाल्यानंतर खासदारांनी मंत्र्यांच्या भेटी घेतल्या तर काही खासदार थेट निवासस्थानी गेले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा