देवीच्या दर्शनावरून परतताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 10:55 IST2018-10-14T10:55:04+5:302018-10-14T10:55:44+5:30

नवरात्री उत्सावामुळे देवीच्या मंदिराकडे जाणारा एक रस्ता केवळ पादचारी भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. तर दुसऱ्या रस्त्यावरील दोन्ही

Fatal accidents, returning from Goddess Durga, 9 people died in the same family | देवीच्या दर्शनावरून परतताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

देवीच्या दर्शनावरून परतताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

डोंबलेश्वर - देवीच्या दर्शनाहून घरी परतणाऱ्या 9 भाविकांचा भीषण अपघातातमृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अपघातातील सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. डोंगरगढ येथून माँ बम्लेश्वरीचे दर्शन घेऊन हे कुटुंब सुमो कारमधून आपल्या भिलाई वन कम्प येथील घरी परतत होते. मात्र, सकाळी समोरुन येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग सोमनीजवळ ही भीषण दुर्घटना घडली. 

नवरात्री उत्सावामुळे देवीच्या मंदिराकडे जाणारा एक रस्ता केवळ पादचारी भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. तर दुसऱ्या रस्त्यावरील दोन्ही बाजुंनी वाहनांची ये-जा होत आहे. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. भिलाई कॅम्प येथील हे कुटुंब दोन वाहनातून डोंगरगढ येथील बम्लेश्वरीच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र, दर्शन घेऊन परत येताना ट्रकला समोरसमोर धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघाताच सुमोचा चेंदामेंदा झाला आहे. मृतांमध्ये 4 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, सर्वच मृतदेह रांजनांदगाव येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

Web Title: Fatal accidents, returning from Goddess Durga, 9 people died in the same family