शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ, १९ तारखेला पुन्हा बैठक

By जयदीप दाभोळकर | Published: January 15, 2021 6:57 PM

समितीकडून विचारणा झाल्यानंतर सरकार बाजू मांडणार, तोमर यांची महिती

ठळक मुद्देशेतकरी नेते, सरकारमधील चर्चेची नववी बैठकही निष्फळ१९ जानेवारी रोजी चर्चेची दहावी फेरी

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने केलेले कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणली असून त्यावर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्य़ासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची आज ९वी फेरी पार पडली. या बैठकीत काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा सरकारला होती. परंतु चर्चेच्या नवव्या फेरीतदेखील कोणताही तोडगा निघालेला नाही. आता १९ जानेवारी रोजी सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची दहावी फेरी होणार आहे. आजच्या चर्चेदरम्यान जेवणापूर्वी सरकारनं हरयाणातील करनाल येथे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सभेत झालेल्या तोडफोडीचा मुद्दा मांडला. तर दुसरीकडे शेतकरी नेत्यांनीदेखील पंजाबमध्ये ट्रान्सपोटर्सकडे टाकण्यात आलेल्या एनआयएच्या छाप्याचा विरोध केला. "या प्रकरणाचा चर्चेतूनच मार्ग काढला जावा अशी दोन्ही पक्षांची बैठकीदरम्यान सहमती झाली. १० जानेवारी रोजी चर्चेची दहावी फेरी पार पडणार आहे. आजच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या समितीबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही," अशी माहिती बैठकीनंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी माध्यमांना दिली.  "तिन्ही कृषी कायदे मागे घेणं आणि एमएसपीवरील हमी ही आमची मागणी आजही कायम आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीकडे आम्ही जाणार नाही. आम्ही केंद्र सरकारशीच चर्चा करणार आहे. एमएसपीलाच आमचं प्राधान्य आहे आणि सरकार त्यापासून दूर पळत आहे," असंही टिकेत यावेळी म्हणाले.  दरम्यान, बैठकीनंतर कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधला. "तिन्ही शेतकरी कायद्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसंच आवश्यक त्या बाबींवर सविस्तर चर्चाही झाली. शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन करण्याचे आम्ही प्रयत्न केले. १९ जानेवारी रोजी १२ वाजता पुन्हा एकदा चर्चा होमार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागतच आहे. समितीकडून जेव्हा विचारणा होईल तेव्हा सरकार आपली बाजूही मांडेल," असं तोमर म्हणाले. तसंच आम्ही शेतकरी संघटनांना सांगितलंय की त्यांनी अनौपचारिक एक समूह तयार करावा. त्यात योग्य पद्धतीनं कायद्यांवर चर्चा व्हावी आणि त्यानंतर त्यांनी त्याचा मसुदा सरकारकडे सोपवावा. त्यावरही सरकार विचार करण्यास तयार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्लीHaryanaहरयाणाBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय