शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

VIDEO: सिंघू सीमेवर पुन्हा आंदोलक शेतकरी-स्थानिकांमध्ये संघर्ष; पोलिसांकडून लाठीमार

By कुणाल गवाणकर | Published: January 29, 2021 2:24 PM

Farmers Protest: शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळ सोडावं यासाठी स्थानिक आक्रमक; पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात २ महिन्यांपासून आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. शेतकरी आंदोलनावर ठाम असताना स्थानिकांनी या भागात धाव घेतली आहे. हा परिसर मोकळा करण्याची मागणी करत त्यांनी शेतकऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला केल्यानं तणाव वाढला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करत लाठीमार केला. प्रजासत्ताक दिनी झालेला तिरंग्याचा अपमान दुर्दैवी; राष्ट्रपतींकडून नाराजी व्यक्तकेंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सिंघू सीमेवर शेतकरी गेल्या २ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलन करत असलेल्या भागांमध्ये आज स्थानिक मोठ्या संख्येनं दाखल झाले. हातात तिरंगा घेऊन आलेल्या स्थानिकांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. आंदोलकांनी परिसर मोकळा करण्याची मागणी त्यांनी केली. स्थानिक आणि आंदोलक आमनेसामने वातावरण तापलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला....अन् 'त्या' घटनेनं वातावरण बदललं; ट्रॅक्टर घेऊन रातोरात शेकडो शेतकरी दिल्लीच्या वेशीवरशेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गैरसोय होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळेच आंदोलकांनी परिसर मोकळा करण्याचं आवाहन स्थानिकांनी केलं. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चावेळी हिंसाचार झाला. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसून धर्मध्वज फडकवला. याचा निषेध स्थानिकांनी केला. आंदोलकांकडून झालेला हिंसाचार घटनेवरील हल्ला असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, अशा घोषणादेखील त्यांनी दिल्या.

टॅग्स :Farmerशेतकरी