शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

Hathras Case: कडेकोट पोलीस बंदोबस्तात हाथरस पीडितेचं कुटुंब रवाना; आज हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी

By कुणाल गवाणकर | Published: October 12, 2020 7:47 AM

Hathras Case: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी; पीडितेचे वडील, आई, भावासह पाच जण जबाब नोंदवणार

हाथरस/लखनऊ: कडेकोड पोलीस बंदोबस्तात हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचं कुटुंब लखनऊला रवाना झालं आहे. आज या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यासाठी सकाळी पीडितेचे कुटुंबीय पोलीस बंदोबस्तात लखनऊसाठी निघाले.पीएफआय-भीम आर्मीमध्ये कोणतेही संबंध नाहीत; ईडीचा तपासातून निष्कर्षआपण स्वत: पीडित कुटुंबासोबत जात असल्याची माहिती एसडीएम अंजली गंगवार यांनी दिली. 'कुटुंबाच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. डीएम आणि एसपीदेखील सोबत आहेत,' अशी माहिती गंगवार यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार आज न्यायालयात पीडितेचे वडील, आई, भावासह पाच जण जबाब नोंदवतील."बडगा उगारल्याशिवाय शासन, प्रशासन जागं होत नाही, सर्वोच्च न्यायालयावर ही वेळ का यावी?"रात्री निघण्यास कुटुंबानं केला विरोधकुटुंबाला रविवारीच लखनऊला नेण्याची योजना पोलिसांनी आखली होती. मात्र आपल्या जिवाला धोका असल्याचं म्हणत कुटुंबानं निघण्यास नकार दिला. उच्च न्यायालयानं स्वत: हाथरस प्रकरणाची दखल घेतली आहे. न्यायालयानं गृह सचिव, डीजीपी, एसपी आणि हाथरसच्या डीएमना समन्स बजावलं आहे.हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; आरोपीवर गुन्हा दाखल​​​​​​​२९ सप्टेंबरला पीडितेचा मृत्यू१४ सप्टेंबरला उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातल्या चंदपा भागात एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या तरुणीवर आधी अलिगढच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे २९ सप्टेंबरला तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपुष्टात आली. त्यानंतर रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीचं शेवटचं दर्शनही घेऊ दिलं गेलं नसल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी हाथरसला गेले होते.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार