There are no ties in the PFI-Bhim Army; Conclusions from ED's investigation | पीएफआय-भीम आर्मीमध्ये कोणतेही संबंध नाहीत; ईडीचा तपासातून निष्कर्ष

पीएफआय-भीम आर्मीमध्ये कोणतेही संबंध नाहीत; ईडीचा तपासातून निष्कर्ष

नवी दिल्ली : चंद्रशेखर आझाद हे प्रमुख असलेली भीम आर्मी व मूलतत्त्ववादी संघटना म्हणून ओळखली जाणारी पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया (पीएफआय) या दोन्ही संघटनांमध्ये कोणतेही संबंध नसल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) स्पष्ट केले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या काळात तणाव निर्माण केल्याचा आरोप या संघटनांवर होता. भीम आर्मी व इतर संघटना हाथरसमधील दलित मुलीचे कुटुंबियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ब्रिजलाल यांनी केला होता.

हाथरसमधील दलित मुलीला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली उत्तर प्रदेशमध्ये जातीय दंगली घडवून आणण्याचा कट असून, त्यासाठी हवालामार्गे १०० कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत, असे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले होते; पण हे वृत्त तथ्यहीन आहे, असे ईडीने आता म्हटले. हाथरसला दलित मुलीच्या नातेवाईकांना भेटायला जात असलेल्या चार व्यक्तींना त्यांचे पीएफआय संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. त्यामध्ये केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन यांचाही समावेश आहे.

निदर्शनांत पीएफआय सक्रिय
उत्तर प्रदेश माजी पोलीस महासंचालक व त्या राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष असलेले ब्रिजलाल म्हणाले की, पीएफआय व तिची संलग्न संस्था कॅम्पस फ्रंट आॅफ इंडिया या हाथरस घटनेविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांच्या वेळी एकदम सक्रिय बनल्या होत्या. या घटनेवरून जातीय दंगली घडविण्यासाठी या संघटना १०० कोटी रुपये खर्च करणार आहेत. मात्र, ब्रिजलाल यांचा हा दावा ईडीने फेटाळून लावला.

Web Title: There are no ties in the PFI-Bhim Army; Conclusions from ED's investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.