अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 20:00 IST2025-09-07T19:58:21+5:302025-09-07T20:00:47+5:30

उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने मोठी कारवाई करत बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या एका तरुणाला बरेली येथून अटक केली आहे.

Fake Aadhaar card for just Rs 1500, 'he' fooled two thousand people! How did the police catch him? | अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?

अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?

उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने मोठी कारवाई करत बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या एका तरुणाला बरेली येथून अटक केली आहे. हा तरुण बनावट आधार कार्ड बनवण्याचे सॉफ्टवेअर विकून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून चार एटीएम कार्ड, एक लॅपटॉप, काही बनावट आधार कार्ड आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. आरोपी जयवीर गंगवार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मदतीने लोकांची फसवणूक करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवीर गंगवार १५०० रुपयांना हे बनावट सॉफ्टवेअर विकत होता. तो या सॉफ्टवेअरचा वापर करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड देखील देत होता. आतापर्यंत त्याने उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरातसह अनेक राज्यांमधील दोन हजारांहून अधिक लोकांना हे बनावट सॉफ्टवेअर विकून लाखोंची फसवणूक केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून करायचा फसवणूक

चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपी जयवीर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर या सॉफ्टवेअरची जाहिरात करायचा. जे लोक त्याच्याशी संपर्क साधायचे, त्यांना तो ऑनलाइन हे बनावट सॉफ्टवेअर विकायचा. आतापर्यंत त्याने हजारो लोकांची लाखोंची फसवणूक केली आहे. सध्या एसटीएफची टीम आरोपीची कसून चौकशी करत आहे, जेणेकरून या प्रकरणातील इतर पैलू आणि त्याच्या नेटवर्कमध्ये असलेल्या लोकांचा शोध घेता येईल.

चार एटीएम, लॅपटॉप आणि मोबाईल जप्त

एसटीएफने आरोपी जयवीरकडून चार एटीएम कार्ड, अनेक बनावट आधार कार्ड, एक लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. पोलीस एटीएम कार्डवरील व्यवहारांची आणि मोबाईल व लॅपटॉपमधील डिजिटल पुराव्यांची तपासणी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस जयवीरचा शोध घेत होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Fake Aadhaar card for just Rs 1500, 'he' fooled two thousand people! How did the police catch him?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.