शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

यूपीए सरकार हटवण्याच्या कटात फेसबुक भाजपसोबत! काँग्रेसने केला हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 12:39 PM

लोकशाहीची चेष्टा होऊ देणार नाही

ठळक मुद्देदेशाच्या राजकारणातील फेसबुकच्या भूमिकेवरून निर्माण झालेल्या वादाने घेतले नवेच वळण षड्यंत्र रचण्यात फेसबुकचे साह्य घेतले जात होते...

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला सत्तेतून दूर करण्याच्या कारस्थानात फेसबुक भाजपसोबत हातमिळवणी करून काम करीत होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. देशाच्या राजकारणातील फेसबुकच्या भूमिकेवरून निर्माण झालेल्या वादाने मंगळवारी नवेच वळण घेतले. त्याचे कारण होते, तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारमधील माहिती व तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांच्या विरोधी पक्षांसोबत होणाऱ्या गोपनीय बैठकांशी संबंधित दस्तावेज सार्वजनिक होणे. या दस्तावेजांच्या आधारावर काँग्रेसने आपले जोरदार हल्ले करताना आरोप केला की, यूपीए सरकारला सत्तेतून दूर करण्याच्या कारस्थानात फेसबुक भाजपसोबत हातमिळवणी करून काम करीत होता. हा दस्तावेज सार्वजनिक होताच राहुल गांधी यांनी ट्विट केले की, पक्षपात, खोट्या बातम्या आणि द्वेषाने भरलेल्या गोष्टींशी आम्ही कठीण संघर्ष करून लोकशाहीची चेष्टा होऊ देणार नाही. वॉल स्ट्रीट जर्नलने खुलासा केला की, फेसबुक या प्रकारचे असत्य आणि द्वेष पसरविण्याचे काम करीत आले आहे आणि त्याबद्दल सगळ्या भारतीयांनी प्रश्न विचारला पाहिजे. राहुल गांधी यांनी त्यांच्या टष्ट्वीटसोबत पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी मार्क झुकेरबर्ग यांना लिहिलेले तीन पानी पत्रही दिले आहे.

षड्यंत्र रचण्यात फेसबुकचे साह्य घेतले जात होते...

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी असाच दस्तावेज सार्वजनिक केला आणि सिद्ध केले की, आंखी दास गुगल आणि यंग इंडियाच्या धोरण ठरवणाऱ्यांसोबत बोलत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खुलासा. ‘आम्ही लोक दिवंगत अरुण जेटलीजींबाबत लिहितो आहोत. त्यावेळी जेटली विरोधी पक्षात होते. जी चिठ्ठी जेटली सरकारला लिहीत होते ती आम्ही ड्राफ्ट केली आहे.’ 

फेसबुक अरुण जेटलीजी यांचे म्हणणे भाजपचे एका वरिष्ठ नेत्याचे. ते एक विरोधी पक्षनेते होते. संसदेत त्यांची चिठ्ठी ड्राफ्ट कोण करीत होते, तर आंखी दास. फेसबुक करीत होता. का? विरोधी पक्ष कोणत्या मुद्यावर काय बोलेल, सरकारला काय लिहिणार, कसे घेरणार याचे षड्यंत्र रचण्यात त्यांचे साह्य घेतले जात होते, असे खेडा विचारतात. 

खेडा यांनी असे अनेक खुलासे केले. त्यातून हे सिद्ध होत होते की, फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅपची भारतातील शाखा भाजपशी हातमिळवणी करून मनमोहनसिंग सरकारला सत्तेतून हटविण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्याच्या षड्यंत्राचा भाग होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी