शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

दलित मतांसाठी भाजपाची खेळी; अमित शहांच्या रॅलीमध्ये शिजणार 3,000 किलो खिचडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 20:12 IST

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत भाजपानं आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवातून धडा घेत भाजपानं आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.  आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दलित समाजासोबत संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि विश्वविक्रम रचण्यासाठी भाजपाकडून जवळपास 3,000 किलोग्रॅम खिचडी बनवण्यात येणार आहे. रविवारी नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या भाजपाच्या रॅलीदरम्यान खिचडी बनवण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे खिचडीसाठी लागणारे तांदुळ आणि डाळ ही जवळपास तीन लाख दलितांच्या घरातून जमा करण्यात येणार आहे. रामलीला मैदानावर होणाऱ्या भीम महासंगम रॅलीमध्ये ही खिचडी शिजवण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या सभेला संबोधित करणार आहेत.

दिल्लीतील भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष मोहनलाल गिहारा यांनी सांगितले की,''आम्ही आतापर्यंत दोन लाख दलित घरांतून अन्नधान्य गोळा केले आहे. येत्या काही दिवसांत आम्ही तीन लाख घरांचे लक्ष्य पूर्ण करणार आहोत. शिवाय, या कामगिरीची विश्वविक्रम म्हणून नोंद व्हावी, यासाठी गिनीज बुककडे संपर्क साधणार आहे.  यापूर्वी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी 918.8 किलोग्रॅम खिचडी बनवण्याचा विश्वविक्रम रचला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी वेगवेगळे जिन्नस वापरून 3000 किलोची खिचडी एकाच भांड्यात तयार केली होती.


सलग 53 तास नॉनस्टॉप कुकींगचा विश्वविक्रम करणारे शेफ विष्णू मनोहर यांनी घराघरात आणि गरीबांच्या ताटातील खिचडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न याद्वारे केला. जागतिक खाद्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी नागपुरातील चिटणीस पार्कमध्ये 3000 किलोची खिचडी तयार केली. ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी कोल्हापुरातून खास प्रकारची कढई मागवली होती. ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी 11 फुटांचा सराटा वापरला. लाकडाच्या इंधनाचा वापर करून त्यांनी स्वादिष्ट खिचडी तयार केली. 



 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीSC STअनुसूचित जाती जमातीAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकाल