अतिरेक्यांचा ५७ तासांनी खात्मा

By Admin | Updated: October 13, 2016 06:10 IST2016-10-13T06:10:34+5:302016-10-13T06:10:34+5:30

श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पम्पोरच्या सरकारी इमारतीत लपलेल्या अतिरेक्यांना मारण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत बुधवारी ५७ तासांनी

Extremists killed in 57 hours | अतिरेक्यांचा ५७ तासांनी खात्मा

अतिरेक्यांचा ५७ तासांनी खात्मा

श्रीनगर : श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पम्पोरच्या सरकारी इमारतीत लपलेल्या अतिरेक्यांना मारण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत बुधवारी ५७ तासांनी सैन्याला चांगले यश मिळाले. सैन्याने गोळीबार करून आणि कमांडोजच्या साह्याने दोन अतिरेक्यांना ठार मारले आहे. या इमारतीत आणखी एक अतिरेकी असण्याची शक्यता असून, या सर्व कारवाईत इमारत मात्र, पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तिथे तीन अतिरेकी घुसल्याचा अंदाज होता, पण तो पळून गेला असावा, अशी शक्यता आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत दोन अतिरेक्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यापैकी एकाचा खात्मा कालच करण्यात आला होता. उद्योजकता विकास संस्थेच्या इमारतीत रविवारपासून लपून बसलेल्या अतिरेक्यांविरुद्ध सैन्याकडून ही कारवाई सुरू आहे. सुरक्षा दलाने इमारतीच्या एका भागात प्रवेश मिळविला आहे, पण ते सावधपणे पुढे पावले टाकत आहेत. संध्याकाळी मोहीम संपल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Extremists killed in 57 hours