शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

Explained : जाणून घ्या भारतात बंदीनंतरही कसं वापरलं जातंय TikTok

By जयदीप दाभोळकर | Published: January 21, 2021 11:52 AM

सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर सरकारनं घातली होती बंदी

ठळक मुद्देसुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर सरकारनं घातली होती बंदीबंदीनंतरही अनेकांकडून टिकटॉकचा वापर, अहवालातून बाब उघड

२९ जून २०२० रोजी सुरक्षेच्या कारणास्तव शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म TikTok ला भारतात बॅन करण्यात आलं. परंतु आजही असे अनेक जण आहेत जे या अॅपचा सर्रास वापर करताना दिसतात. सिमिलस बेवकडून यासंदर्भात एक डेटा जारी करण्यात आला आहे. यातच याबाबतची माहितीही मिळाली आहे. हे एक ऑनलाईन वेब पोर्टल आहे जे वेब अॅनालिटिक्स सर्व्हिस प्रदान करतं.'डिजिटल ट्रेंड्स' नावाच्या एका अहवालात त्यांनी सांगितलं की डिसेंबर २०२० मध्ये सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या तुलनेत टिकटॉकवर अधिक भारतीय युझर्स अॅक्टिव्ह होते. गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जूनदरम्यान लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टिकटॉकच्या युझर्समध्ये वाढ दिसून आली. परंतु जुलै नंतर यात घट होत गेली, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. मनी कंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे टिकटॉक हे अॅप बॅन केलं असलं तर ऑगस्ट आणि ऑक्टोबरदरम्यान महिन्याच्या अॅक्टिव्ह युझर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली. बंदी नंतरही अनेक जणांकडून याचा वापर कसा केला जातो हा महत्त्वाचा प्रश्न आहे.  "तात्काळ बंदी हे नव्यानं अॅप इन्स्टॉल करण्यावर होती. याचा अर्थ असा की युझर्सना नव्यानं टिकटॉक हे अॅप डाऊनलोड करता येणार नव्हतं. जर एखाद्या व्यक्तीनं हे अॅप जरी डिलीट केलं असेल तरी त्याला ते पुन्हा इन्स्टॉल करता येणार नाही. परंतु ज्यांच्याकडे पूर्वीपासून मोबाईलमध्ये हे अॅप आहे ते आताही या अॅपचा वापर करू शकतात," अशी माहिती बेक्सले अॅडव्हाझर्सचे कार्यकारी अध्यक्ष उत्कर्ष सिन्हा यांनी सांगितलं."टिकटॉक जरी बॅन असलं तरी यावर सातत्यानं अॅक्टिव असणारे लोक ते अॅप डाऊनलोड करण्यासाठी अन्य मार्गांचा वापर करत आहेत. या अॅपची .apk फाईल ही अन्य वेबसाईटवरूनही डाऊनलोड केली जाऊ शकते," अशी माहिची डिजिटल ऑडिओ प्लॅटफॉर्म खबरीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित शर्मा यांनी दिली. याव्यतिरिक्त याचा वापर करण्यासाठी VPN चा वापर करणंदेखील शक्य आहे. याद्वारे कोणताही युझर बॅन असतानादेखील ते कंटेंट सहरित्या अॅक्सेस करू शकत असल्याची माहिती सायबर वकिल जोनिस वर्गिस यांनी सांगितलं. "पूर्वीच्या तुलनेत आता अनेकांना VPN ची माहिती आहे. ते सेट करणारे अनेक अॅप्स आज मोफतही मिळतात. याद्वारे त्या साईटपर्यंत पोहोचणं शक्य आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. "'आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कंटेंटचं चांगलं नाव आहे. टिकटॉक हा एक ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. भारताच्या बाहेर दुबई, नेपाळ, श्रीलंकेसारख्या देशांमध्येही हा अतिशय लोकप्रिय आहे. या ठिकाणी लोकांना भारतीय कंटेंट अधिक आवडतो. एवढंच काय तर बॅन झाल्यानंतरही अॅपचा वापर करू शकत नसले तरी अनेक फेमस लोकांचं फॉलोअर्सही वाढले आहेत," अशी माहिती एमएडी इन्फ्ल्यूएन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम माधवन यांनी दिली. 

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकIndiaभारतSocial Mediaसोशल मीडियाchinaचीनMobileमोबाइल