शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

CronaVirus News : देशात प्रत्येकाची कोरोना चाचणी होणे आवश्यक : पूनावाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 01:17 IST

CronaVirus News : या लसीचे संशोधन व उत्पादनावर मोठी गुंतवणूक करण्याचे आम्ही ठरविले आहे. ते म्हणाले, कोरोनावर प्रतिबंधक लस शोधल्यानंतर ती देशातील प्रत्येकापर्यंत पोहोचायला आणखी एक वर्ष लागेल.

नवी दिल्ली : देशातील प्रत्येकाची कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाच्याच मनात सुरक्षित असल्याची भावना निर्माण होईल. देशात दररोज होणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढवायला हवे, असे सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पूनावाला यांनी सांगितले.पूनावाला हे व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इंडिया या संस्थेचेही प्रमुख आहेत. ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीचे लक्षावधी डोस जगाला हवे असतील तर त्यातील काही लसींच्या उत्पादनाला आॅगस्ट-सप्टेंबरपासून सुरुवात करावी लागेल. आम्ही तयार करत असलेल्या लसीबाबतही असाच विचार केला आहे. या लसीचे संशोधन व उत्पादनावर मोठी गुंतवणूक करण्याचे आम्ही ठरविले आहे.ते म्हणाले, कोरोनावर प्रतिबंधक लस शोधल्यानंतर ती देशातील प्रत्येकापर्यंत पोहोचायला आणखी एक वर्ष लागेल. त्यामुळे सर्वांना ही लस उपलब्ध होण्यास किमान दीड वर्ष तरी लागेल. या सर्वांचा मध्यबिंदू काढायचा झाल्यास देशात लस सर्वांपर्यंत पोहोचण्यास किमान दोन वर्षे लागू शकतात. कोरोनाचा संसर्ग झालेल्या ७० ते ८० टक्के लोकांमध्ये या आजाराची कोणतीच लक्षणे जाणवत नाहीत. उत्तम आरोग्य असेल तर कोरोना विषाणूचा फारसा परिणाम जाणवत नाही. लस उपलब्ध होईपर्यंत अनेकांचा आजार बरादेखील झालेला असेल.आयसीएमआरच्या पत्रावरून गदारोळ नकोइंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही संस्था भारत बायोटेक या कंपनीच्या सहकार्याने बनवीत असलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या चाचण्या लवकर पूर्ण केल्यास १५ आॅगस्टपासून ही लस उपलब्ध करता येईल, असे पत्र आयसीएमआरच्या संचालकांनी सहभागी संस्थांना पाठविले. त्यावरून माजलेल्या गोंधळाबद्दल अदर पुनावाला यांनी सांगितले, या पत्रामधील मजकुराचा विपर्यास करण्यात आला आहे. आम्ही प्रयोग वेगाने व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहोत. लसीच्या प्रयोगांचे निष्कर्ष काय येतात याची सर्वांनी शांतपणे वाट पाहावी. आयसीएमआरच्या पत्राच्या मुद्द्यावरून इतका गदारोळ माजविला जाऊ नये.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या