शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

युग चांडक खून खटला -- जोड

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

स्कूलबॅग माझ्या बसण्याच्या खुर्चीवर ठेवून वडिलाच्या क्लिनिकमध्ये जात असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने स्कूलबॅग घरी नेण्यास सांगितली होती. त्यानंतर तो स्कूटीवाल्या मुलाकडे गेला होता. युग स्कूटीवर बसला होता. स्कूटीचालक मुलाने स्कार्फ तोंडाला बांधला होता. त्यानंतर ते दोघेही छापरूनगर चौकपरिसराच्या दिशेने निघून गेले होते.

स्कूलबॅग माझ्या बसण्याच्या खुर्चीवर ठेवून वडिलाच्या क्लिनिकमध्ये जात असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने स्कूलबॅग घरी नेण्यास सांगितली होती. त्यानंतर तो स्कूटीवाल्या मुलाकडे गेला होता. युग स्कूटीवर बसला होता. स्कूटीचालक मुलाने स्कार्फ तोंडाला बांधला होता. त्यानंतर ते दोघेही छापरूनगर चौकपरिसराच्या दिशेने निघून गेले होते.
युगची स्कूलबॅग त्याच्या घरी पोहोचविण्यासाठी गेलो असता सुषमा नावाच्या मोलकरणीने युगबाबत विचारले होते. तिला युग हा क्लिनिकच्या एका कर्मचाऱ्यासोबत गेल्याचे सांगितले होते.
काही वेळानंतर चांडक यांचा ड्रायव्हर आला होता. त्याने युगबद्दल चौकशी केली होती. त्यालाही क्लिनिकच्या कर्मचाऱ्याने युगला नेल्याचे सांगितले होते. ड्रायव्हरने मोबाईलवरून डॉ. चांडक यांना सांगितले होते. लागलीच चांडक घरी परत आले होते. त्यांच्या पत्नीही घाई गडबडीने घरी परत आल्या होत्या. त्यांना आपण सर्वकाही सांगितले होते. सायंकाळी ६ वाजता पोलीस आले होते. त्यांनाही आपण याबाबत सांगितले होते.
२० दिवसानंतर आपणास पोलिसांनी नोटीस देऊन कारागृहात आरोपीच्या ओळखपरेडसाठी बोलावले होते. २५ सप्टेंबर रोजी मी नागपूर मध्यवर्ती कारागृहात गेलो होतो. सात जणांना एका रांगेत उभे ठेवून आपणास घटनेच्या दिवशी जांभळ्या रंगाच्या स्कूटीने गुरु वंदना अपार्टमेंट येथे येऊन युगचे अपहरण करणाऱ्यास ओळखण्यास सांगण्यात आले होते. रांगेत चौथ्या क्रमांकावर उभ्या असलेल्या मुलास ओळखले होते. अधिकाऱ्याने या मुलास त्याचे नाव विचारले असता त्याने अरविंद सिंग, असे सांगितले होते.
या साक्षीदाराने न्यायालयात बसून असलेल्या दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी अरविंद सिंगला ओळखले. युगचे अपहरण करणारा हाच तो आरोपी आहे, असे त्याने सांगितले. त्याने युगचे छायाचित्रही ओळखले.
न्यायालयात या साक्षीदाराची उलटतपासणी बाचाव पक्षाचे वकील ॲड. प्रदीप अग्रवाल आणि ॲड. मनमोहन उपाध्याय यांनी घेतली. न्यायालयात फिर्यादी डॉ. चांडक यांचे वकील ॲड. राजेंद्र डागा, बचाव पक्षाच्या वकिलांचे सहाय्यक ॲड. राजेश्री वासनिक, ॲड. प्रमोद उपाध्याय उपस्थित होते. आज संगणक तज्ज्ञ हितेश राठोड यांची उलटतपासणी साक्ष बचाव पक्षाकडून घेण्यात आली. आता या खटल्याची सुनावणी ८ एप्रिलपासून होईल.