शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमित शेतरस्ते, शिवरस्ते मोकळे करा! महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

अकोला: जिल्ह्यातील अतिक्रमित शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्ते मोकळे करून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवारी महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत दिले.

अकोला: जिल्ह्यातील अतिक्रमित शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्ते मोकळे करून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवारी महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित जिल्ह्यातील महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील शेतरस्ते, शिवरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करणे आणि रोहयो अंतर्गत या रस्त्यांच्या खडीकरणाची कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. महसूल विभागांतर्गत जमीन व इतर प्रकारची प्रलंबित प्रकरणे महसूल अदालती घेऊन निकाली काढण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले. तसेच विस्तारित समाधान योजनेंतर्गत जिल्ह्यातील तालुका स्तरावर महाशिबिरे आयोजित करून, विविध योजनांतर्गत लाभार्थींना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिंदे यांनी यावेळी दिले. या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, एम.डी.शेगावकर, प्रमोदसिंह दुबे, उदय राजपूत, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
बॉक्स.................................................
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वितरण करा!
राजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिबिरे घेऊन, शाळांमधील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, डोमिसाईल, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअर व इतर प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी महसूल अधिकार्‍यांना या बैठकीत दिले.