नारायणगावाच्या दोन संघांची जिल्हास्तरावर निवड

By Admin | Updated: September 4, 2015 21:54 IST2015-09-04T21:54:24+5:302015-09-04T21:54:24+5:30

नारायणगाव : जुन्नर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत नारायणगाव येथील १६ वर्षे मुली प्रथम, १७ वर्षे मुले प्रथम, १७ वर्षे मुली द्वितीय क्रमांक मिळाविला आहे. प्रथम क्रमांक मिळविलेल्या दोन्ही संघांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक एच़ पी़ नरसुडे व क्रीडाप्रमुख ए़ बी. कानडे यांनी दिली़

Election of two teams of Narayanagawa at the district level | नारायणगावाच्या दोन संघांची जिल्हास्तरावर निवड

नारायणगावाच्या दोन संघांची जिल्हास्तरावर निवड

रायणगाव : जुन्नर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत नारायणगाव येथील १६ वर्षे मुली प्रथम, १७ वर्षे मुले प्रथम, १७ वर्षे मुली द्वितीय क्रमांक मिळाविला आहे. प्रथम क्रमांक मिळविलेल्या दोन्ही संघांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक एच़ पी़ नरसुडे व क्रीडाप्रमुख ए़ बी. कानडे यांनी दिली़
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने या स्पर्धा शरदचंद्र पवार इंजिनिअरिंग कॉलेज ओतूर येथे झाल्या़
स्पर्धेतील यशस्वी संघ व संघातील खेळाडू :
१७ वर्षे मुले : प्रथम- विपुल शिंदे, शुभम गुळवे, आकाश सरवदे, अक्षय सरवदे, हृषीकेश वायकर, सौरभ सोलाट, संकेत सोलाट, विनोद सोलाट, रोहित ढवळे, गौरव मुळे, संतोश शिंदे.
१७ वर्षर्े मुली : द्वितीय व १६ वर्षे मुली : प्रथम- सानिका वाणी, अक्षदा डोंगरे, प्रियंका शिंदे, काजल आवटे, प्रतीक्षा वायकर, सुनीता पवार, अक्षदा गुळवे, निकीत वायकर, गायत्री भोर, नलिनी मुळे, मधुरा गुळवे, निकिता गुळवे.
या सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्याध्यापक एच़ पी़ नरसुडे व क्रीडाप्रमुख ए़ बी. कानडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. अब्दुल कलाम यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी साकारलेली अनोखी भित्तीचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात विद्यालयातील १०वी तील विद्यार्थिनी ऐश्वर्या जाधव हिला मोठ्या गटातील तृतीय क्रमाकांचे रोख रु. ५०० व सन्मानचिन्ह मिळाले. तिला एस़ बी़ वाव्हळ यांनी मार्गदर्शन केले़
ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, अनिलतात्या मेहेर, सुरेश संचेती, डॉ़ आनंद कुलकर्णी, रवींद्र पारगावकर, अरविंद मेहेर, आल्हाद खैरे, सुजित खैरे, बाळासाहेब भरविरकर, शशिकांत वाजगे, सोमजीभाई पटेल, अशोक शहा, तानाजी वारूळे, रमेश जुन्नरकर, संदीप डोळे, तसेच गुंजाळवाडीच्या सरपंच अंबिका दरेकर, उपसरपंच शरद शिंदे, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी यशस्वी खेळाडूंचा सत्कार केला.

Web Title: Election of two teams of Narayanagawa at the district level