नवी दिल्ली : अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्व्हम गटाकडे राहील असा निर्णय निवडणूक आयोगाने गुरुवारी दिला. या निर्णयामुळे व्ही. के. शशिकला यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे.निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ई. पलानीस्वामी यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, ई. पलानीस्वामी यांनी भाजपासोबत जवळीक वाढत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी फेटाळून लावला आहे. अण्णाद्रमुक पक्षाचे अनेक आमदार, खासदार आणि कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. या सर्व बाबींचा विचार करुन निवडणूक आयोगाने निर्णय आमच्या बाजूने दिल्याचे ई. पलानीस्वामी यांनी सांगितले.
अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह ई. पलानीस्वामी यांच्या गटाकडे, शशिकला गटाला झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 19:26 IST
अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्व्हम गटाकडे राहील असा निर्णय निवडणूक आयोगाने गुरुवारी दिला. या निर्णयामुळे व्ही. के. शशिकला यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे.
अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह ई. पलानीस्वामी यांच्या गटाकडे, शशिकला गटाला झटका
ठळक मुद्देअण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह ई. पसानीस्वामी गटाकडेव्ही. के. शशिकला यांच्या गटाला मोठा झटकाआमदार, खासदार आणि कार्यकर्ते आमच्या सोबत - ई. पसानीस्वामी