Election Result 2022 : 'पराभवातून शिकू...'; पाचही राज्यांत काँग्रेसची पिछाडी; राहुल गांधी आशावादी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 04:26 PM2022-03-10T16:26:11+5:302022-03-10T16:26:33+5:30

Election Result 2022 : गुरूवारी पाचही राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी पार पडली. निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Election Result 2022: 'Let's learn from defeat ...'; Congress lags behind in all five states; Rahul Gandhi is optimistic! | Election Result 2022 : 'पराभवातून शिकू...'; पाचही राज्यांत काँग्रेसची पिछाडी; राहुल गांधी आशावादी!

Election Result 2022 : 'पराभवातून शिकू...'; पाचही राज्यांत काँग्रेसची पिछाडी; राहुल गांधी आशावादी!

Next

Election Result 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचे बहुतांश निकाल आता स्पष्ट होत आहेत. काँग्रेसला पाचही राज्यात मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्येही आपनं जोरदार मुसंडी घेत काँग्रेसचा पराभव केला आहे. अन्य राज्यांमध्येही काँग्रेसला काही चांगली कामगिरी करता आलेली नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी आपण जनतेचा निर्णय स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. 

"आम्ही जनतेचा निर्णय स्वीकारत आहोत. ज्या लोकांना जनतेनं कौल दिला त्यांना हार्दिक शुभेच्छा. मेहनतीसाठी आणि समर्पणासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि वॉलेंटिअर्स यांना शुभेच्छा. आम्ही यातून शिकू आणि जनहितासाठी काम करत राहू," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 
पंजाबमध्ये आपची मुसंडी
पंजाबमध्ये आपनं जोरदार मुसंडी घेतली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणदीप सिंग चन्नी यांचा दोन्ही जागेवरून पराभव झाला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षानं काँग्रेसचा सुपडा साफ करत जवळपास ९२ जागांपर्यंत मुसंडी घेतली आहे. तर काँग्रेसला केवळ १८ जागांवरच समाधान मानावं लागल्याचं चित्र दिसून येतंय. तर भाजपला २ आणि अकाली दलाला ४ जागांवर समाधान मानावं लागल्याचं दिसतंय.

 

Web Title: Election Result 2022: 'Let's learn from defeat ...'; Congress lags behind in all five states; Rahul Gandhi is optimistic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.