शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
3
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
4
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
5
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
6
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
7
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
8
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
9
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
10
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
11
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
12
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
13
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
14
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
15
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
16
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
17
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
18
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
19
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
20
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 13:57 IST

Election Commission : 'बिहारच्या मतदार यादीमध्ये नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेशच्या नागरिकांसह मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांची नावे असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

Election Commission : बिहार निवडणुकीआधीच मतदार यादीतील गोंधळ समोर आला आहे. मतदार पडताळणी मोहिमेत एक मोठा खुलासा झाला आहे. बिहारच्या मतदार यादीत मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांची नावे आहेत, यामध्ये नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेशचे नागरिक आहेत',अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. या परदेशी लोकांकडे मतदार कार्ड, आधार कार्ड आणि रेशन कार्ड देखील आहेत. निवडणूक आयोगाने घरोघरी पडताळणी करुन माहिती घेतली, यामध्ये मोठा खुलासा झाला आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, त्यांची नावे अंतिम मतदार यादीत राहणार नाहीत. SIR चा उद्देश मतदार यादीतून बेकायदेशीर मतदारांना काढून टाकणे आहे. मतदार पडताळणीच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणादरम्यान, या वस्तुस्थितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कारण काँग्रेससह महाआघाडीतील सर्व पक्ष या मोहिमेला विरोध करत आहेत.

'या सर्व लोकांची नावे ३० सप्टेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या अंतिम मतदार यादीतून काढून टाकली जातील. देशभरात मतदार पडताळणी केली जाईल जेणेकरून चुकीच्या मार्गाने कार्ड मिळवून मतदार बनलेल्या परदेशी घुसखोरांना मतदार यादीतून काढून टाकले जाईल. यासाठी त्यांचे जन्मस्थान पडताळले जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

'शनिवारपर्यंत बिहारमध्ये जारी केलेल्या एसआयआर अंतर्गत ८०.११ टक्के मतदारांनी त्यांचे फॉर्म सादर केले आहेत. फॉर्म सादर करण्याची प्रक्रिया निर्धारित अंतिम मुदतीपर्यंत (२५ जुलै) पूर्ण केली जाणार आहे, असा दावा निवडणूक आयोगाने केला. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे पाहता, मतदार पुनरीक्षणाचा मुद्दा देशातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. विरोधी पक्षांनी ते थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ते थांबवण्यास नकार दिला तर निवडणूक आयोगाला काही सूचना दिल्या.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहारElectionनिवडणूक 2024