कर्जवसुली लवादावर आठ पीठासीन अधिकारी नियुक्त

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:39+5:302014-12-18T00:40:39+5:30

कर्जवसुली लवादावर आठ पीठासीन अधिकारी नियुक्त

Eight Presiding Officers on Debt Relief Law | कर्जवसुली लवादावर आठ पीठासीन अधिकारी नियुक्त

कर्जवसुली लवादावर आठ पीठासीन अधिकारी नियुक्त

्जवसुली लवादावर आठ पीठासीन अधिकारी नियुक्त
नागपुरात वॉरियर तर पुण्यात ठक्कर

नवी दिल्ली : कर्जवसुली लवादाच्या (डीआरटी) नागपूर आणि पुणे शाखेच्या अध्यक्षपदी अनुक्रमे कृष्णप्रसाद रामचंद्र वॉरियर आणि दीपक ठक्कर यांची नियुक्त करण्यात आली आहे. नियुक्त्यांवरील कॅबिनेट कमिटीतर्फे वॉरियर आणि ठक्कर यांनी पुढील पाच वर्षे किंवा त्यांच्या वयाची ६२ वर्षे यापैकी जो काळ कमी अवधीचा असेल त्या काळासाठी ही नियुक्त करण्यात आली आहे.
यासोबतच कॅबिनेट कमिटीने चंदीगड, पाटणा, लखनौ, दिल्ली आणि चेन्नईतील लवादासाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यात हरचरण सिंग (चंदीगड), अक्षय बिपिन (चंदीगड), राधाकृष्ण गणपती कुरेल्ला (चेन्नई), डॉ. रेखा धाकड (दिल्ली), डॉ. राजीव विक्रम सिंग गौतम (लखनौ)आणि राममूर्ती कुशवाह (पाटणा) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Eight Presiding Officers on Debt Relief Law