'त्या' ग्रीन फाइलींमध्ये नेमकं काय? ईडीच्या छाप्यादरम्यान स्वतः ममता बॅनर्जी पोहोचल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:36 IST2026-01-08T15:36:19+5:302026-01-08T15:36:43+5:30

ED Raid In Kolkata: ईडीच्या I-PAC वरील छापेमारीदरम्यान, आपल्या फाइली घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः आल्या.

ED Raid In Kolkata: What exactly is in 'those' green files? Mamata Banerjee herself reached during the ED raid | 'त्या' ग्रीन फाइलींमध्ये नेमकं काय? ईडीच्या छाप्यादरम्यान स्वतः ममता बॅनर्जी पोहोचल्या...

'त्या' ग्रीन फाइलींमध्ये नेमकं काय? ईडीच्या छाप्यादरम्यान स्वतः ममता बॅनर्जी पोहोचल्या...

ED Raid In Kolkata: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे अंमलबजावणी संचालनालयच्या (ईडी) कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संबंधित असलेली राजकीय सल्लागार संस्था Indian Political Action Committee (I-PAC) वर ईडीने धाड टाकल्यानंतर ममतांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

I-PAC च्या ठिकाणांवर ईडीच्या धाडी

ईडीने सेंट्रल कोलकात्यातील I-PAC चे वरिष्ठ अधिकारी प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी तसेच सॉल्ट लेक सेक्टर-5 येथील गोदरेज वॉटरसाइड इमारतीतील I-PAC च्या कार्यालयावर छापे टाकले. प्रतीक जैन हे ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक रणनीती टीममधील महत्त्वाचे सदस्य मानले जातात. 

दरम्यान, छापेमारीची माहिती समजताच तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सॉल्ट लेक येथील कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले.

ममता बॅनर्जींचा थेट अमित शाहांवर निशाणा

ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, ही संपूर्ण कारवाई गृह मंत्र्याच्या इशाऱ्यावर झाली आहे. ममतांनी यावेळी आरोप केला की, केंद्र सरकार तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी, पक्षाची अंतर्गत रणनीती आणि निवडणूक नियोजनाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ईडीने पक्षाशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज चोरल्याचा आरोपही केला.

पक्षाची रणनीती चोरण्याचा प्रयत्न

माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ईडीचा छापा हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत राजकीय रणनीतीपर्यंत पोहोचण्यासाठी टाकण्यात आला आहे. आयटी क्षेत्राशी संबंधित कार्यालयात येऊन उमेदवारांची यादी, निवडणूक प्लॅन आणि पक्षाची रणनीती चोरणे हे ईडी किंवा गृह मंत्र्यांचे काम आहे का? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.

दस्तऐवज उचलून गाडीत ठेवण्यावरून वाद

या कारवाईदरम्यान काही महत्त्वाच्या फाइली मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनात ठेवण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. या फाइल्समध्ये नेमकी कोणती संवेदनशील माहिती होती, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. या प्रकरणावर तृणमूल काँग्रेस किंवा ईडीकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

I-PAC आणि तृणमूल काँग्रेसचे जुने नाते

I-PAC ही संस्था गेल्या काही वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची प्रमुख निवडणूक रणनीतीकार म्हणून कार्यरत आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत I-PAC च्या रणनीतीमुळे टीएमसीला भाजपविरोधात मोठा विजय मिळाला होता. त्यानंतर हा करार 2026 पर्यंत वाढवण्यात आला. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्येही I-PAC ने तृणमूल काँग्रेसला रणनीतिक पाठबळ दिले होते.

I-PAC चा राजकीय प्रवास

इंडियन पॉलिटिकल एक्शन कमिटीची स्थापना 2013 मध्ये ‘सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स’ या नावाने झाली होती. राजकीय पक्षांसाठी अजेंडा तयार करणे आणि निवडणूक रणनीती आखणे हे या संस्थेचे मुख्य काम आहे. 2014 मधील ‘चाय पे चर्चा’, ‘मोदी आयेंगे’, ‘घर-घर मोदी’ यांसारख्या मोहिमा I-PAC शी संबंधित राहिल्या आहेत. बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये विविध पक्षांसाठी I-PAC ने काम केले आहे.

 

 

Web Title : उन हरी फाइलों में क्या है? ईडी छापे में ममता बनर्जी!

Web Summary : ईडी ने ममता बनर्जी से जुड़े आई-पीएसी कार्यालयों पर छापा मारा, जिससे राजनीतिक उथल-पुथल मच गई। बनर्जी ने अमित शाह पर पार्टी की रणनीति और दस्तावेज चुराने का आरोप लगाया, केंद्रीय एजेंसियों के दुरुपयोग का आरोप लगाया।

Web Title : What's in those green files? Mamata Banerjee at ED raid!

Web Summary : ED raided I-PAC offices linked to Mamata Banerjee, sparking political turmoil. Banerjee accuses Amit Shah of stealing party strategy and documents during the raid, alleging misuse of central agencies.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.