शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

मनी लाँड्रिंग: ED ची मोठी कारवाई; अभिनेता Dino Morea, दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या जावयाची संपत्ती जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 9:08 PM

Assets Of Actor Dino Morea, Ahmed Patel's Son-In-Law Seized In Fraud Case: गुजरातमधील व्यापारी संदेसारा बंधूंनी केलेल्या १४,५०० कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्याच्या एका प्रकरणाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देसंदेसारा बंधूंनी केलेल्या १४,५०० कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्याच्या एका प्रकरणाअंतर्गत कारवाई८.७९ कोटी रूपयांची एकूण संपत्ती जप्त

काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता दिनो मोरया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती सक्तवसूली संचलनालयानं जप्त केली आहे. गुजरात स्थित स्टर्लिंग बायोटेक समुहाशी निगडीत एका घोटाळ्याप्रकरणी ईडीद्वारे ही कारवाई करण्यात आली. गुजरातमधील व्यावसायीक संदेसारा बंधुंच्या १४,५०० कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्याच्या एका प्रकरणाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

पीएमएलए कायद्याअंतर्गत चार लोकांची संपत्ती जप्त करण्याचे सुरूवातीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सक्तवसूली संचलनालयानं दिली आहे. या संपत्तीची एकूण किंमत ८.७९ कोटी रूपये इतकी आहे. यामध्ये खान याच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची किंमत तीन कोटी रूपये आहे. तर दिनो मोरयाच्या संपत्तीची किंमत १.४ कोटी रूपये आणि डीजे अकील म्हणजेच अब्दुलखलील बचुअलीच्या संपत्तीची किंमत १.९८ कोटी रूपये इतकी आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दीकी याच्या संपत्तीची किंमत २.४१ कोटी रुपये इतकी आहे. स्टर्लिंग बायोटेक समूहाच्या फरारी प्रवर्तक नितीन सांदेसरा आणि चेतन संदेसारा यांनी या गुन्ह्यातून मिळवलेली रक्कम चार जणांना दिली असल्याचं ईडीनं सांगितलं. नितीन संदेसारा, चेन संदेसारा, त्याची पत्नी दीप्ती संदेसारा आणि हितेश पटेल या चौघांना फरार आर्थिक अधिकारी घोषित केलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरण स्टर्लिंग बायोटेक आणि मुख्य प्रवर्तक तसंच संचालकांनी केलेल्या १४,५०० कोटी रुपयांच्या बँक फसवणूकीशी संबंधित आहे.

टॅग्स :Dino Moreaडिनो मोरियाMONEYपैसाGujaratगुजरातEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय