Eclipse of corona to the country! Number of patients crossed 4 lakh | CoronaVirus देशाला कोरोनाचे ग्रहण! रुग्णांचा आकडा 4 लाख पार; मृत्यूचा उच्चांक

CoronaVirus देशाला कोरोनाचे ग्रहण! रुग्णांचा आकडा 4 लाख पार; मृत्यूचा उच्चांक

नवी दिल्ली : कोरोनाने देशाला ग्रहण लावले आहे. गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांचा आकडा सर्वाधिक 15413 एवढा वाढला असून यामुळे एकूण रुग्णांच्या संख्येनेही चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 


आज 306 रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आजवरच सर्वात मोठा आकडा आहे. देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 410461 वर पोहोचली आहे. यामध्ये 169451 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 227756 रुग्ण बरे झाले आहेत. मृत्यूंची संख्याही 13254 वर गेली आहे. एकूण रुग्णांपैकी ५४.१२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. लॉकडाऊन शिथिल करून देशातील जनजीवन आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सरु असतानाच बाधितांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांच्या चिंतेतही भर पडत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेसिस यांनी सांगितले की, कोरोना साथ पुन्हा मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा धोका असल्याने सर्व देश व तेथील नागरिकांनी अतिशय सावध राहिले पाहिजे.
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

२५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार; एकापेक्षा एक धासू फिचर देणार

Solar Eclipse 2020 : थोड्याच वेळात यंदाचे सर्वांत मोठे सूर्यग्रहण; 'इथे' LIVE पाहता येणार

अंकिता, तूच सुशांतला वाचवू शकली असतीस, पण...; मित्राची भावनिक पोस्ट

घरातच काढलेत! हे भन्नाट फोटो पहाल तर चक्कर येऊन पडाल

राज्यसभेत एनडीए आता सर्वांत मजबूत स्थितीत; पण...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Eclipse of corona to the country! Number of patients crossed 4 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.