राज्यसभेत एनडीए आता सर्वांत मजबूत स्थितीत; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 03:15 AM2020-06-21T03:15:34+5:302020-06-21T06:37:28+5:30

असे असले तरी २४५ सदस्यांच्या सभागृहात बहुमताची १२३ सदस्यसंख्या गाठण्यासाठी आणखी २२ जागा जिंकण्याची गरज आहे.

The NDA is now in the strongest position in the Rajya Sabha | राज्यसभेत एनडीए आता सर्वांत मजबूत स्थितीत; पण...

राज्यसभेत एनडीए आता सर्वांत मजबूत स्थितीत; पण...

Next

नितीन अग्रवाल 
नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीनंतर संसदेच्या वरिष्ठ सभागृहात भाजप व एनडीएची ताकद वाढली आहे. १९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ८ जागा जिंकून एनडीएची सदस्य संख्या प्रथमच तीन अंकी झाली आहे. यापूर्वीही भाजपने कर्नाटक व अरुणाचल प्रदेशातील पाचपैकी ३ जागा बिनविरोध जिंकलेल्या आहेत. अशा प्रकारे ७५ जागा असलेल्या भाजपची संख्या आता ८६ व निवडणुकीपूर्वी ९० जागा असलेल्या एनडीएची सदस्यसंख्या आता १०१ झाली आहे. इतिहासात प्रथमच एनडीए एवढ्या मजबूत संख्येवर राज्यसभेत पोहोचला आहे. असे असले तरी २४५ सदस्यांच्या सभागृहात बहुमताची १२३ सदस्यसंख्या गाठण्यासाठी आणखी २२ जागा जिंकण्याची गरज आहे.
राज्यसभेत ६५ सदस्यीय यूपीएमध्ये काँग्रेसचे ४४ सदस्य आहेत. त्याबरोबरच राष्टÑवादी ४, आरजेडी ५, डीएमके ७, पीडीपी २, जेडीएस २ व जेएमएमचा एक सदस्य आहे. याशिवाय शिवसेनेच्या सदस्यांची संख्या यात जोडली तर ही संख्या आणखी तीनने वाढेल. या संख्याबळावर राज्यसभेमध्ये सत्ताधारी एनडीएशी मुकाबला करण्यासाठी यूपीएला संघर्ष करावा लागणार आहे.
१० राज्यांतील २४ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक २६ मार्च रोजी होणार होती. परंतु त्यातच लॉकडाऊन जाहीर केल्याने या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. कर्नाटकच्या चार व अरुणाचल प्रदेशच्या एका जागेसह एकूण पाच जागी प्रत्येकी एकेकच उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने तेथील निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यात माजी पंतप्रधान व जेडीएस नेते एच. डी. देवेगौडा, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे व भाजप नेते इरन्ना कडाडी व अशोक गस्ती यांचा समावेश होता. याशिवाय अरुणाचल प्रदेशातून भाजपचे नबाम रेबिया यांनाही बिनविरोध निर्वाचित घोषित करण्यात आले. या २४ जागांसह यावर्षी राज्यसभेच्या एकूण ६१ जागांवर निवडणूक झालेली आहे.
>एनडीएचे आता १0१ सदस्य
कोरोना लॉकडाऊननंतर झालेल्या निवडणुकीत मजबूत स्थितीत पोहोचलेल्या एनडीएला बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस व एआयडीएमके यासारख्या गैर-यूपीए पक्षांची मदत मिळाली तर वरिष्ठ सभागृहात कोणताही कायदा मंजूर करणे सोपे जाईल. सध्या तरी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या १०१ सदस्यांत भाजपचे ८६ सदस्य आहेत. याशिवाय जनता दल युनायटेड ५, शिरोमणी अकाली दल ३ व लोकजनशक्ती पार्टी, बोडो लँड पीपल्स फ्रं ट, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, आसाम गण परिषद, पीएमके व तमिळ मनिला काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. याशिवाय नॅशनल पीपल्स पार्टीचाही (एनपीपी) एक सदस्य आहे.

Web Title: The NDA is now in the strongest position in the Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.