शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध शिथिल हाेताच राेजगारात झाली वाढ; ग्रामीण भागात जास्त सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 06:54 IST

आता उद्योग-धंदे सुरू होत असून, त्यामुळे लोकांना पुन्हा रोजगार मिळू लागला आहे. बाजारात मागणी वाढू लागल्याने उत्पादनही वाढत आहे. रोजगारांमुळे लोकांच्या हातात पैसा येईल आणि तो बाजारात आल्यास आर्थिक चक्र अधिक वेगाने फिरू लागेल, असे दिसत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील बेराेजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली हाेती. मात्र, आता लाट ओसरू लागताच परिस्थितीत सुधारणा हाेत आहे. बेराेजगारीचा दर ८.७ टक्क्यांपर्यंत घटला आहे. गेल्या दीड महिन्यातील हा नीचांकी दर आहे. निर्बंध शिथिल झाल्यामुळे व्यापार आणि उद्याेग-धंदे सुरू हाेत आहेत. बाजारात मागणीही वाढू लागली आहे. राेजगार मिळू लागल्यामुळे लाेकांच्या हातात पैसा येईल. परिणामी आर्थिक चक्र वेगाने फिरू लागेल, अशी अपेक्षा आहे.

आता उद्योग-धंदे सुरू होत असून, त्यामुळे लोकांना पुन्हा रोजगार मिळू लागला आहे. बाजारात मागणी वाढू लागल्याने उत्पादनही वाढत आहे. रोजगारांमुळे लोकांच्या हातात पैसा येईल आणि तो बाजारात आल्यास आर्थिक चक्र अधिक वेगाने फिरू लागेल, असे दिसत आहे.

कडक निर्बंध किंवा लाॅकडाऊनमुळे बेराेजगारीमध्ये माेठी वाढ झाली हाेती. एप्रिलमध्ये सुमारे ७३.५ लाख जणांचे राेजगार गेले हाेते. ‘सीएमआयई’च्या आकडेवारीनुसार मे महिन्यात राष्ट्रीय बेराेजगारीचा दर १२ टक्के हाेता.  शहरी बेराेजगारीचा दर १४.७ टक्क्यांपर्यंत वाढला हाेता. ताे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात घटून ९.७ टक्क्यांवर आला आहे. ग्रामीण बेराेजगारीचा दरही मे महिन्यातील १०.६३ टक्क्यांच्या तुलनेत ८.२३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. 

२.३काेटी  राेजगार दुसऱ्या लाटेने हिरावले या वर्षी जानेवारीमध्ये बेराेजगारीचा दर ६.५२ टक्क्यांपर्यंत घटला हाेता. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल आणि मे महिन्यात पुन्हा राेजगार निर्मितीला धक्का बसला. या दाेन महिन्यांच्या कालावधीत तब्बल २.३ काेटी लाेक बेराेजगार झाले हाेते. 

टॅग्स :Employeeकर्मचारीcorona virusकोरोना वायरस बातम्या