शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

कॅन्सरग्रस्त आयपीएसचे ड्युटी फर्स्ट, लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 4:21 AM

कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे दिल्ली परिसरात अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित मजूरांना धीरही दिला.

नवी दिल्ली : दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त म्हणून नुकतीच नियुक्ती झालेले युवा आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांनी स्वत:वरील कर्करोगाचे उपचार थोडे दिवस बाजूला ठेवून लॉकडाऊनच्या काळात आपल्या कार्यकक्षेतील विभागामध्ये चोख बंदोबस्त राखण्याच्या कामास प्राधान्य दिले. तसेच कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे दिल्ली परिसरात अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित मजुरांना धीरही दिला.त्यांना थायरॉइड ग्रंंथीमध्ये कर्करोग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र तरीही त्यांनी पुढील उपचार घेणे बाजूला ठेवून पोलिस दलातील आपले काम सुरुच ठेवले होते. लॉकडाऊनमुळे दिल्ली परिसरात हजारो स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्यांचे जेवणाखाणाचे हाल होत असून निवाऱ्याच्या अपुºया सोयींमुळे या मजूरांनी रस्त्याला कडेला आश्रय घेतला आहे. नेमका हा भाग आनंद मिश्रा यांच्या कार्यकक्षेत येत असल्याने या स्थलांतरित मजुरांना अन्नधान्याचे वाटप करण्याबरोबरच, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी कसोशीने प्रयत्न केले.मिश्रा यांना थायरॉईड ग्रंथींमध्ये झालेला कर्करोग शरीरात अन्यत्र पसरण्याचा धोका आणखी वाढल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. तसे डॉक्टरांनी सांगताच मग आनंद मिश्रा रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांनी काही दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.अस्वास्थ्यामुळे विचलित झाले नाहीतदिल्लीतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले की, कर्करोगामुळे प्रकृतीत बिघाड झाला असतानाही अतिरिक्त पोलीस उपायुक्त आनंद मिश्रा आपल्या सहकाऱ्यांसमवेत कार्यकक्षेतील विभागात रोज फेरफटका मारत. लॉकडाऊनमुळे दिल्ली परिसरात अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित मजुरांची मिश्रा चौकशी करत असत. प्रत्येकाला अन्नधान्याचे वाटप झाले आहे की नाही याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. एक एप्रिल रोजी मिश्रा यांच्या घशात दुखू लागल्यामुळे कोरोनासह अन्य काही चाचण्या डॉक्टरांनी केल्या. त्यांच्या थायरॉईडच्या ग्रंथीत कर्करोग झाल्याचे निदान त्यातून झाले. मात्र तरीही विचलित न होता आनंद मिश्रा यांनी आपले काम सुरूच ठेवले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस