शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

दारू नव्हे दूध प्या; दुकानांपुढे बांधल्या गायी, भाजप नेत्या उमा भारती यांचे अनोखे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 8:17 AM

Uma Bharti : दारू नव्हे, दूध प्या, असा नारा देत भाजप नेत्या व माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी मध्य प्रदेशमधील ओरछा शहरात दारू दुकानांपुढे गायी बांधल्या व मद्यविक्री करणाऱ्यांचा अनोख्या शैलीत निषेध केला.

ओरछा : दारू नव्हे, दूध प्या, असा नारा देत भाजप नेत्या व माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी मध्य प्रदेशमधील ओरछा शहरात दारू दुकानांपुढे गायी बांधल्या व मद्यविक्री करणाऱ्यांचा अनोख्या शैलीत निषेध केला.

दारूविक्रीला मध्य प्रदेश सरकारने प्रोत्साहन देऊ नये, अशी भूमिका उमा भारती यांनी मांडली आहे. निवारी जिल्ह्यातील ओरछा हे शहर देशभरात मंदिरे व राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. अशा या शहरात त्यांनी दारूविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या शहरातील दारूच्या दुकानासमोर त्यांनी गायी बांधल्या. ‘शराब नही, दूध पियो’ अशी घोषणा देऊन उमा भारती यांनी आसमंत दणाणून सोडला. गेल्यावर्षी जून महिन्यात त्यांनी याच दारूच्या दुकानावर शेण फेकले होते. भोपाळ येथील दारूच्या दुकानावर गेल्यावर्षी मार्च महिन्यात उमा भारतींनी दगडाचा मारा केला होता. 

ओरछा येथील दारूच्या दुकानासमोर उमा भारती यांनी गायी आणून बांधल्यानंतर दुकानदार घाबरला व त्याने दुकानाचे शटर खाली ओढून घेतले. मध्य प्रदेशमधील मद्यपानाची समस्या आम्हाला संपविता आली नाही, अशी कबुली उमा भारती यांनी दिली आहे. (वृत्तसंस्था)

‘शिवराजसिंह चौहान हे धाडसी नेते’nओउमा भारती यांनी सांगितले की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे धाडसी नेते आहेत. उत्पादन शुल्क धोरणात काही त्रुटी असल्याचे त्यांनी मान्य केले व बाबा रामदेव यांच्याशी सल्लामसलत करून या धोरणाचा नवीन मसुदा तयार करण्याचे आश्वासन दिले. नवे उत्पादन शुल्क धोरण लोकांना मद्यपानापासून परावृत्त करेल, असेही चौहान यांनी म्हटल्याची आठवण उमा भारती यांनी करून दिली. nमध्य प्रदेशात दारू विक्रीवर संपूर्ण बंदी घालावी, अशी मागणी उमा भारती यांनी याआधी केली होती. इथे वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीMadhya Pradeshमध्य प्रदेश