शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

DRDO चं अँटी कोविड औषध 2-DG कधी येणार बाजारात, किती असेल किंमत?; डॉ. रेड्डीजनं दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 12:10 PM

DRDO 2G Anti Covid Drug: डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजनं DRDO च्या अँटी कोविड 2-DG औषधाबद्दल काही माहिती दिली आहे. एजन्ट्स आणि बनावट मेसेजेसपासून सावध राहण्याचं डॉ. रेड्डीजनं केलं आवाहन

ठळक मुद्देडॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजनं DRDO च्या अँटी कोविड 2-DG औषधाबद्दल काही माहिती दिली आहे.एजन्ट्स आणि बनावट मेसेजेसपासून सावध राहण्याचं डॉ. रेड्डीजनं केलं आवाहन

हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅब्सनं DRDO च्या अँटी कोरोना औषध 2-DG बाबत काही माहिती जारी केली आहे. भारतात अँटी कोरोना औषध 2-DG ला आपात्कालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे औषध डॉ. रेड्डीज लॅब आणि DRDO च्या INMAS नं एकत्रित विकसित केलं आहे. 2-DG हे एकप्रकारचं ओरलं अँटी व्हायरल औषध आहे. याचा वापर केवळ रुग्णालयात दाखल असलेल्या मध्यम आणि गंभीर स्वरूपाच्या रुग्णांलर डॉ. सल्ल्यानुसार केला जाऊ शकतो, असं डॉ. रेड्डीजनं म्हटलं. Dr. reddys नं दिलेल्या माहितीनुसार 2DG Drug ड्रग अद्याप बाजारात उपलब्ध करण्यात आलेलं नाही. हे औषध जून महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यतचा आहे. त्यापूर्वी येणाऱ्या कोणत्याही संदेशापासून सावध राहण्याचं आवाहन डॉ. रेड्डीज लॅबकडून करण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडियावर करण्यात येणारे दावे खोटे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

किती असेल किंमत?या औषधाची किंमत किती असेल याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. येणाऱ्या काळात याची किंमत ठरवली जाईल. तसंच याची किंमत सामान्य लोकांना परवडेल अशीच ठेवली जाईल आणि लवकरच किंमतीची घोषणा केली जाऊ शकते, असंही त्यांनी नमूद केलं. एजन्टपासून सावध राहा2DG बाबत सांगताना डॉ. रेड्डीजनं एजन्ट्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. काही जण 2DG Drug च्या नावानं बनावट आणि अवैध औषधांची विक्री करत आहेत. यासोबतच सोशल मीडिया आणि WhatsApp वर 2DG संदर्भात येत असलेल्या मेसेजेसपासूनही सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. याशिवाय या औषधाचं कमर्शिअल लाँच आणि मोठ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयातील पुरवठा जून महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता असल्याचंही डॉ. रेड्डीजकडून सांगण्यात आलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतmedicineऔषधंhospitalहॉस्पिटलWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया