शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 18:54 IST

डॉक्टरांकडून उपचार घेण्याची विनंती; उपचारास उपोषणकर्त्यांचा नकार

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. दोघांचीही जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकाने वैद्यकीय तपासणी केली. दोन्ही आंदोलकांचे ब्लड प्रेशर चांगल आहे. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना भोवळ येत आहे. उपचाराची विनंती केली असता उपचार घेण्यास दोघांनी नकार दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. दरम्यान, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवत असताना सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत आज सायंकाळी ६. १५ मिनिटांनी आंदोलकांनी धुळे- सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे रस्तारोको सुरू केला आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे ओबीसी बांधवांनी रस्त्यावर येऊन रास्तारोको सुरू केला आहे. हे जातीवादी मुख्यमंत्री आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी केला. उपोषणकर्ते जीवाचं रान करत आहेत, त्यांचा बीपी सुद्धा वाढलेला आहे. तरीसुद्धा सरकार कुठलीही भूमिका घेत नसल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. आंदोलकांनी अचानक रस्तारोको सुरू केल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. पोलिस आंदोलकांना समजविण्याच्या प्रयत्न करत आहेत. मात्र, आंदोलक रस्त्यावर बसून आहेत. काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.

ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासनाचा घाटमुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासनाचा घाट असून लोकनियुक्त सरकार राज्यघटनेशी धोका करत आहे, असा सनसनाटी आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज केला. तसेच तुम्ही राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रतिनिधी की एका विशिष्ट समाजाचे? असा सवाल देखील हाके यांनी मुख्यमंत्र्यांना केला. तसेच सगेसोयरेचा अध्यादेश लागू झाला तर फक्त ओबीसी बाधित होत नाही, तर एससी आणि एसटी यांच्या आरक्षणावर पण गदा येते. शासन जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही हे सांगत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार, असा पुनरोच्चार देखील हाके यांनी केला.

शांततेत आंदोलन करा; हाके यांच्या विनंतीनंतर रस्ता मोकळाधुळे -सोलापूर महामार्ग वडीगोद्री येथे आक्रमक ओबीसी आंदोलकांनी रोखल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळत राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी दखल घेतल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांत झटापट झाली. दरम्यान, ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला.   

उपोषणाला वाढता पाठिंबाउपोषाकर्त्यांच्या मागणीला पाठिंबा वाढत असून अनेक ठिकाणाहून आंदोलक उपोषणस्थळी दाखल होत आहेत. तसेच अनेक पक्ष संघटना देखील आपला पाठिंबा दर्शवत उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची ओबीसी आंदोलक  लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्याशी फोनवर चर्चा करून प्रकृतीची विचारपूस करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच माझा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा असून मी लवकरच तुमची भेट घेणार आहे असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. त्याचं बरोबर शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही आंदोलकांशी फोनद्वारे चर्चा करून प्रकृतीची विचारपूस केली.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालनाlaxman hakeलक्ष्मण हाके