शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

100 कोटी हिंदूंना बदनाम करू नका, 'टूल किट'वरुन बाबा रामदेव कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 3:02 PM

टूल किटप्रकरणावरु भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले असतानाच आता बाबा रामदेव यांनीही यात उडी घेतली आहे. बाबा रामदेव यांनी टूल किटवरुन 100 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदूंना बदनाम करू नका, असे म्हटलंय. 

ठळक मुद्देटूल किटच्या माध्यमातून कुंभ मेळा, सनातन हिंदू धर्माला बदनाम करणे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कट हे पाप आणि गुन्हा आहे. तुम्ही अतिशय वाईट काम करत आहात

नवी दिल्ली - देशात सापडणाऱ्या विषाणूला ‘भारतीय स्ट्रेन’ किंवा ‘मोदी स्ट्रेन’ असे संबोधण्याचे कथित टूल किट जारी करून काँग्रेस जगभरात देशाची आणि विशेषत: पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करू पहात आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीने मंगळवारी केला. परंतु काँग्रेसने हे टूल किट बनावट असल्याचा सांगत याचा इन्कार केला आहे. आता, योगगुरू बाबा रामदेव यांनीही टूल किट प्रकरणावरुन अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

टूल किटप्रकरणावरु भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले असतानाच आता बाबा रामदेव यांनीही यात उडी घेतली आहे. बाबा रामदेव यांनी टूल किटवरुन 100 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदूंना बदनाम करू नका, असे म्हटलंय.  टूल किटच्या माध्यमातून कुंभ मेळा, सनातन हिंदू धर्माला बदनाम करणे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कट हे पाप आणि गुन्हा आहे. तुम्ही अतिशय वाईट काम करत आहात. देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही. देशातील लोकांनी अशा सनातनी आणि भारतविरोधी शक्तींचा एकत्र येऊन बहिष्कार करायला हवा, असे बाबा रामदेव यांनी म्हटलंय. तसेच, जे लोक असं करत आहेत, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही राजकारण करा, पण 100 कोटींपेक्षा जास्त असलेल्या हिंदू्ंचा अपमान करू नका.

भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न 

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीट केले की, देशात कोरोना महामारीचे संकट असताना राहुल गांधी मात्र या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याची संधी शोधत आहेत, ही अतिशय शरमेची बाब आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देशातील कोरोना विषाणूला मोदी स्ट्रेन म्हणा, असे सांगितले जात आहे. टूल किटचा हवाला देत पात्रा यांनी म्हटले आहे की, काही परदेशी पत्रकारांच्या मदतीने काँग्रेस भारताची प्रतिमा मलिन करू पहात आहे. 

भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करणार

काँग्रेसच्या रिसर्च विभागाला हे टूल किट बनावट असल्याचे आढळले आहे असे स्पष्ट करून पक्षाने या आरोपांचा साफ इन्कार केला आहे. पक्षाच्या वतीने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशातील जनतेला कोरोनापासून वाचविण्याऐवजी आपल्या सरकारला विरोधी पक्षांची बदनामी करण्यात अधिक रस आहे. काँग्रेसच्या रिसर्च विभागाचे प्रमुख राजीव गौडा यांनी ट्विट केले की, देशातील नागरिकांना कोरोनाच्या संकटातून दिलासा देण्याऐवजी भाजप लज्जास्पदपणे कटकारस्थाने करीत आहे. आम्ही जे. पी. नड्डा आणि संबित पात्रा यांच्याविरोधात बनावट कागदपत्रे तयार करण्याबाबत गुन्हा दाखल करणार आहोत.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाHinduहिंदूBaba Ramdevरामदेव बाबा